शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोघा अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक, १३ गुन्हे उघडकीस, १२ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 16:18 IST

ताराबाई पार्क पितळी गणपती चौकात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. संशयित रोहित शिवाजी खरळकर (वय १९, रा. चावडी जवळ, अंबप, ता. हातकणंगले), शुभम संजय घाटगे (२१, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी येथील १३ गुन्ह्यांची कबुली दिली.

ठळक मुद्देदोघा अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक१३ गुन्हे उघडकीस, १२ दुचाकी जप्त

कोल्हापूर : ताराबाई पार्क पितळी गणपती चौकात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. संशयित रोहित शिवाजी खरळकर (वय १९, रा. चावडी जवळ, अंबप, ता. हातकणंगले), शुभम संजय घाटगे (२१, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी येथील १३ गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून तीन लाख किमतीच्या १२ दुचाकी जप्त केल्या आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार यांचे तपास पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

कॉन्स्टेबल संतोष माने यांना खबऱ्याकडून ताराबाई पार्क येथे पितळी गणपती चौकात रेकॉर्डवरील दोघे चोरटे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानुसार शनिवार (दि. १९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास सापळा रचला असता, संशयित रोहित खरळकर व शुभम घाटगे दुचाकीसह मिळून आले.

त्यांच्याजवळील दुचाकीला नंबरप्लेट नव्हती. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. जिल्ह्यातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, गांधीनगर, वडगाव, शिरोली एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत व सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे गुन्हे केले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून येथील दुकानात चोरी केली आहे. दोघेही सराईत चोरटे आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर