शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

कोल्हापूरच्या जंगलात लवकरच येणार चंद्रपूरवरून दोन वाघ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत होणार स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 11:28 IST

आदित्य वेल्हाळ  कोल्हापूर : चंदपूरच्या जंगलातून घोषित चारपैकी दोन वाघ लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील दाट जंगलात येणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र ...

आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : चंदपूरच्या जंगलातून घोषित चारपैकी दोन वाघ लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील दाट जंगलात येणार आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि वनविभागातर्फे त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळून मोहीम आखणी केली जात आहे. हे वाघ ही कोल्हापूरचीही प्राणी संपत्ती ठरू शकणार असल्याने लोकांनीही त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.पश्चिम घाटाच्या वैभवसंपन्न जैवविविधतेने नटलेल्या व त्यातील समृद्ध जंगलांचा काही भाग आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे आणि याच जंगलात आता अन्नसाखळीतील महत्त्वाचा भाग असणारा वाघ विसावणार आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव म्हणून २००७ ला घोषित झाल्यानंतर या जंगलातील वाघांचा सूक्ष्म अभ्यास राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत (नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन अथॉरिटी) व वनविभागामार्फत केला गेला.कर्नाटकातील भीमगड वाइल्डलाइफ सेंच्युरी, गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्य व महाराष्ट्रातील तिल्लारी, राधानगरी, आंबा, चांदोली, महाबळेश्वर, कोयना हा कॉरिडॉर वाघांचा मुख्य भ्रमण मार्ग आहे. येथूनच वाघांचे स्थलांतर होत असते; पण ते या जंगलात आपली हद्द तयार करून येथे राहत नसत हे अभ्यासानंतर लक्षात आले.

चार वर्षांपूर्वी प्राधिकरणाच्या अभ्यासकांनी या जंगलांचा सखोल अभ्यास करून कुरण विकास, पाणवठे वाढ, तृणभक्षक प्राण्यांची पैदास वाढ असे कार्यक्रम सुरू केले. उपवनसंरक्षक उत्तम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चितळांची पैदास करण्यात दोन वर्षे वनविभागाने जे विशेष कष्ट घेतले त्यामध्ये त्यांना यश आले. त्याचेच फलित म्हणून सतत स्थलांतर करणारे वाघ आता या जंगलात राहत आहेत, हे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यातील चित्रीकरणाच्या माध्यमातून लक्षात आले आहे.डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये कोल्हापुरातील जंगलात एक नर वाघ मुक्कामास असणे ही चांगली व महत्त्वाची घटना असून प्राधिकरणाने चंद्रपूरच्या जंगलातून चार वाघ आपल्या जिल्ह्यातील जंगलात सोडणार असल्याचे दोन वर्षांपूर्वी घोषित केले होते. आता या वाघांना येथे सोडण्याची योग्य परिस्थिती निदर्शनात आल्याने लवकरच चार वाघांपैकी दोन वाघ हे या जंगलात आणणार असल्याचे समजते. ते कोठे व कधी आणणार, याची प्राधिकरण व वनविभाग कमालीची गुप्तता पाळत आहे.या वाघांच्या येण्याने जिल्ह्यातील जंगले ही अधिक समृद्ध तर होणारच आहेत; पण त्या वाघांची पुढची पिढी येथे जन्माला यावी व त्यांची डरकाळी आपल्या जंगलात पुन्हा ऐकू यावी, यासाठी विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

  • राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत होणार स्थलांतर.
  • वाघांसाठी बनवलेल्या विशेष गाडीतून प्रवास
  • विशेष नियंत्रित वातावरणाची गाडीत रचना
  • गाडी सुरू असताना वाघांवर नजर ठेवण्यासाठी विशेष सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय.
  • सकाळी सहा ते बारा व सायंकाळी चार ते नऊ याच वेळात वाघांचे गाडीतून स्थलांतर
  • रेडिओ कॉलरमार्फत या वाघांवर दोन महिने लक्ष ठेवण्यात येणार
टॅग्स :kolhapurकोल्हापूरTigerवाघforest departmentवनविभाग