शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर परिक्षेत्रात दिवसाला दोन आत्महत्या: समाजासमोर चिंता--कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५३३ जणांनी जीवनयात्रा संपविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 01:02 IST

कोल्हापूर : परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत दिवसाला दोन आत्महत्या होतात.

ठळक मुद्दे संकटाला धैर्याने सामोरे न जाता आत्महत्या करून जीवन संंपविण्याकडे वाढता कल कुटुंबाचा विचार न करता विष किंवा गळफास घेऊन मोकळे होतात आजकालचे पालक मुलांना समजावयाला किंवा बोलायला घाबरतात,

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत दिवसाला दोन आत्महत्या होतात. कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभरात ५३३ आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या करणाºयांत तरुणांची संख्या जास्त असून, ही बाब चिंताजनक आहे. संकटाला धैर्याने सामोरे न जाता आत्महत्या करून जीवन संंपविण्याकडे वाढता कल आहे. गेल्या दोन वर्षांतील परिक्षेत्रातील आकडेवारी पाहिली असता त्यामध्ये वाढ झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

आजकाल सोशल मीडियामुळे कॉलेज तरुण-तरुणींमध्ये एक वेगळ्या प्रकाराचे वातावरण निर्माण झालेले दिसते. पुस्तकांपेक्षा ते मोबाईलवर चॅटिंग करण्यात ते धन्यता मानतात आणि त्यातूनच मैत्री, प्रेम वाढत जाते आणि नको इतक्या प्रमाणात ते स्वत:ला वाहून घेतात. त्यातूनच एकतर्फी प्रेमाचा किंवा घरच्यांचा विरोध अशा गोष्टींमुळे तरुण-तरुणी निराशेत जातात आणि आत्महत्येकडे वळतात.

उच्चशिक्षित युवकांचेही आत्महत्येचे प्रमाण तितक्याच प्रमाणात वाढत आहे. काही युवक स्वाभिमान दुखावल्याच्या नैराश्येतून टोकाची भूमिका घेतात, तर काही व्यवसायात, नोकरीत थोड्याशा आलेल्या अपयशानेही स्वत:चे जीवन संपवितात. कर्जबाजारी झालेल्या काही शेतकºयांना स्वत:चे जीवन स्वस्त झाले आहे. कुटुंबाचा विचार न करता विष किंवा गळफास घेऊन मोकळे होतात. त्यांच्या जाण्यानंतर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते. आजही ज्या घरातील व्यक्तीने आत्महत्या केली आहे, त्या कुटुंबातील लोक स्वत:ला सावरू शकलेले नाहीत.नवविवाहितांची मानसिकतानवविवाहितेच्या आत्महत्येचे कारण शोधले असता सासरचा जाच, चारित्र्यावर संशय, प्रॉपर्टी आणि पैशांची मागणी, त्याचबरोबर शिक्षणामुळे वाढलेल्या त्यांच्या अपेक्षा, त्यांची पूर्तता न झाल्याने आलेले नैराश्य आणि अपमानास्पद जाचाला कंटाळून अखेर आत्महत्येचा पर्याय निवडतात. पतीकडून भ्रमनिरास झालेला असतो. माहेरी परत जावे तर आपल्याला स्वीकारणार नाहीत किंवा वडिलांची अब्रू जाईल, अशा कोंडीत सापडलेल्या नवविवाहिता मरणाला जवळ करतात.मुलांमधील न्यूनगंडमराठी शाळेत शिकणाºया लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन युवकांच्या स्वभावामध्ये आयुष्याबद्दल एक न्यूनगंड तयार झाला आहे. मग त्यात आई-वडील अभ्यास कर म्हटले अथवा एखादी चैनीची गोष्ट द्यायला नकार दिला, तर ती मुलं किंवा तरुण घरातून पळून जाण्यापासून आत्महत्येपर्यंतचा विचार करत आहेत. त्यामुळे आजकालचे पालक मुलांना समजावयाला किंवा बोलायला घाबरतात, त्यामुळे हीएक मोठी समस्या बनत चाललीआहे.

परिक्षेत्रातील आकस्मिक मृतांची जिल्हावार नोंदकोल्हापूर : १०४५सांगली : १२६३सातारा : ११९५सोलापूर ग्रामीण : १५२४पुणे ग्रामीण : ५५१३

पैसा मिळविण्यासाठी काहीही करण्याची मानसिकता तरुण पिढीमध्ये आहे. त्यामध्ये ते अपयशी ठरले तर नैराश्य येते आणि त्यातून ते आत्महत्या करतात. त्यांचे हट्ट पुरविले जातात आणि मग ते स्वत:ला हिरो समजतात. ज्यावेळी त्यांची भावना दुखावली जाते, त्यावेळी ते स्वत:ला सावरू शकत नाहीत. त्यातून ते जीवन संपवितात. पालकांनी सुरुवातीपासून काही गोष्टी आपणाला शक्य नाहीत, याची जाणीव मुलांना करून देणे गरजेचे आहे.- डॉ. सुभदा दिवाण, समुपदेशक, कोल्हापूर‘आत्महत्या’ हे काय समस्येवर उत्तर नाही. नैराश्य आलेल्या व्यक्तींनी त्या समस्येकडे संधी म्हणून पाहिले तर अनेक उत्तरे मिळतात. विचार करण्याची क्षमता वाढते. ही सकारात्मक वृत्ती ठेवल्यास आपोआप नैराश्येतून बाहेर पडू शकतो.- डॉ. प्रशांत अमृतकर , कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक

 

जीवनामध्ये एखादे अपयश किंवा नैराश्य आले तरी खचून न जाता येणारा दिवस आपला आहे, असे समजून ओढावलेल्या संकटांवर मात करायला शिकले पाहिजे. आत्महत्येमुळे सगळे प्रश्नसुटतात असे नाही, तर ते वाढतात आणि अधिक गुंतागुंतीचे बनतात आणि आपल्याच कुटुंबाला त्याचा आयुष्यभर त्रास सहन करावाद्यलागतो.- अजित मोहिते,   ज्येष्ठ विधिज्ञ, कोल्हापूर