कोल्हापूर : कोल्हापूरात जवळपासच्या दोन सराफी दुकानात अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी पहाटे धाडसी चोरी केल्याचे उघडकीस आले असून अंदाजे २२ लाखांचा ऐवज त्यांनी लंपास केला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी जरी ही चोरी झाली असली तरी ती एकाच टोळीने केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले आहेत.कोल्हापूरातील महाद्वार रोडवरील लक्ष्मी मुकूंद अपार्टमेंट येथील प्रमोद कल्लाप्पा कोलेकर (देसाई) यांच्या मालकीच्या सराफ दुकानात पहाटे सव्वा चारच्या सुमारास तीन चोरट्यांनी प्रवेश करुन ही चोरी केली. हे तिघेजण एका व्हॅनमधून आल्याचे रोडवरील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरुन उघड झाले आहे. या चोरट्यांनी हत्याराने दुकानाचे शटर तोडून प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने ठेवलेली दोन बाय अडीचच्या आकाराची तिजोरीच उचलून नेली. या तिजोरीला सायरन लावलेले होते, तरीही चोरट्यांनी चोरी केली.
कोल्हापूरात दोन सराफी दुकानात धाडसी चोरी, २२ लाखाचे ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 13:54 IST
कोल्हापूरात जवळपासच्या दोन सराफी दुकानात अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी पहाटे धाडसी चोरी केल्याचे उघडकीस आले असून अंदाजे २२ लाखांचा ऐवज त्यांनी लंपास केला आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी जरी ही चोरी झाली असली तरी ती एकाच टोळीने केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले आहेत.
कोल्हापूरात दोन सराफी दुकानात धाडसी चोरी, २२ लाखाचे ऐवज लंपास
ठळक मुद्देकोल्हापूरात दोन सराफी दुकानात धाडसी चोरीरोख रक्कमेसह २२ लाखाचे ऐवज लंपास