शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सिद्धार्थनगर दंगलीतील आणखी दोघांना अटक, पाचजणांची पोलिस कोठडीत रवानगी, धरपकड सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 18:34 IST

तपासावर वरिष्ठांची नजर

कोल्हापूर : फलकबाजीच्या वादातून शुक्रवारी (दि. २२) रात्री सिद्धार्थनगर कमानीजवळ झालेल्या दंगलीतील आणखी दोघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. २५) रात्री अटक केली. आसिफ अब्दुल शेख (वय ३४) आणि इकबाल सिकंदर महात (३५, दोघे रा. राजेबागेस्वार दर्ग्याजवळ, कोल्हापूर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. रविवारी अटक केलेल्या पाचजणांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.तौसिफ निजाम शेख (३२), निहाल रहिमतुल्ला शेख (२१), सद्दाम यारजंग महात (३७), सूरज ऊर्फ अश्पाक शब्बीर नायकवडी (३४) आणि इक्बाल दाऊद सरकवास (५५, सर्व रा. राजेबागेस्वार दर्ग्याजवळ, कोल्हापूर) अशी अटकेतील दंगलखोरांची नावे आहेत. अटकेतील एकूण दंगलखोरांची संख्या सात झाली.राजेबागेस्वार येथील तरुण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त सिद्धार्थनगर कमानीजवळ लावलेल्या फलकांवरून दोन गटांतील वादाला सुरुवात झाली होती. या वादाचे दंगलीत पर्यवसान झाल्याने दोन्ही गटांकडून प्रचंड दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील सुमारे ४०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.यातील ३१ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांची धरपकड सुरू आहे. रविवारी रात्री अटक केलेल्या पाचजणांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांकडून त्यांची अधिक चौकशी सुरू असून, दंगलीत सहभागी झालेल्या अन्य संशयितांची नावे निष्पन्न केली जात आहेत.धरपकड सुरूअटकसत्र सुरू होताच गुन्हे दाखल झालेल्या संशयितांनी पळ काढला आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री दोन संशयितांना ताब्यात घेतले. आणखी काही दंगलखोर पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्ह्यातील त्यांचा सहभाग स्पष्ट होताच अटकेची कारवाई करणार असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दिली.तपासावर वरिष्ठांची नजरदंगलीच्या गुन्ह्याचा तपास लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांच्याकडून सुरू आहे. मात्र, गंभीर प्रकार घडल्याने या गुन्ह्याच्या तपासावर पोलिस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांचेही लक्ष आहे. बच्चू यांनी सोमवारी दुपारी निरीक्षक कन्हेरकर यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला. तसेच गुन्हा दाखल झालेल्या सर्व संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या.