शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

देशात दोन लाख टन दूध पावडर पडून : राज्यात रोज ४० लाख लिटर दूध अतिरिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:20 IST

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : महाराष्टÑात गेल्या सात-आठ महिन्यांपासून अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर बनला असून, रोज ४० लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे. या दुधाची पावडर करण्याशिवाय पर्याय नसला तरी देशातंर्गत व आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पावडरचे दर घसरल्याने दूध संघांपुढे पेच निर्माण झाला आहे. देशात दोन लाख तर राज्यात ३० हजार टन ...

ठळक मुद्देदुग्ध व्यवसाय कोलमडला

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : महाराष्टÑात गेल्या सात-आठ महिन्यांपासून अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर बनला असून, रोज ४० लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे. या दुधाची पावडर करण्याशिवाय पर्याय नसला तरी देशातंर्गत व आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पावडरचे दर घसरल्याने दूध संघांपुढे पेच निर्माण झाला आहे. देशात दोन लाख तर राज्यात ३० हजार टन दूध पावडर गोडावूनमध्ये पडून राहिल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.राज्यात गाय व म्हैस दुधाच्या उत्पादनात वाढ झाली असून सध्या सुमारे दीड कोटी लिटर उत्पादन आहे. त्यातील एक कोटी लिटर दूध केवळ गायीचे आहे. कोल्हापूर, सांगली, जळगाव जिल्हा वगळता इतर ठिकाणी गायीच्या दुधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.संकलन होणाऱ्या दुधापैकी सरासरी एक कोटी लिटर लिक्विड (पाऊच)मध्ये विक्री केली जाते. उर्वरित जवळपास ५० लाख लिटर दुधाची पावडर करावी लागते. हीच परिस्थिती संपूर्ण देशात आहे. मे २०१७ पासून पावडरच्या दरात घसरण सुरू आहे. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पावडरचे दर १२० रुपये किलोपर्यंत खाली आल्याने दूध उत्पादक संघ अडचणीत आले.राज्य सरकारने गाय व म्हैस दुधाचे दर वाढविण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला पण संघांना फटका बसू लागल्याने दोन महिन्यांत दरकपात करावी लागली.पावडरचे दर घसरत गेल्याने मध्यंतरी संघांनी गायीचे दूध स्वीकारणे बंद केल्याने उत्पादक हवालदिल झाले. त्यानंतर दर कमी करून दूध घेतले तरी अजूनही हा व्यवसाय तोट्यात आहे. बहुतांशी संघ गायीचे दूध (३.५ फॅट) सरासरी २२ रुपये लिटरने खरेदी करतात.गेले वर्षभर अस्थिर बाजारपेठेने दूध संघांचा कोटींचा तोटा झाला आहे. सहा-सात वर्षांपूर्वी असेच संकट आले होते, त्यावेळी ‘युपीए’ सरकारने पावडर किमतीच्या ७ टक्के निर्यात अनुदान दिले होते. त्याचा संघांना फायदा झाला होता. सध्या १० टक्के अनुदान देण्याची मागणी संघाकडून होत आहे.गोरगरिबांचा व्यवसाय उद्ध्वस्त होईलजगात अतिरिक्त दुधाचे संकट आहे, पण तेथील सरकार पावडरला थेट अनुदान देते. येथे इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वेळा सरकारकडे पाठपुरावा केला, पण दुर्दैवाने भाजप सरकार गांभीर्याने बघत नाही. आणखी काही महिने अशीच परिस्थिती राहिली तर गोरगरिबांचा व्यवसाय उद्ध्वस्त होईल, अशी इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण नरके यांनी खंत व्यक्त केली.