हातकणंगले : कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावर मालेफाटा नजिक अपघात झाला. या अपघातात भरधाव दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. तर एक वृद्धाही गंभीर जखमी झाली आहे. आज, सोमवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.शितल बाळासो पाटील (वय २८, रा. हरोली ता. शिरोळ) आणि सुरज श्रीकांत शिंदे (रा. चंदूर ता. हातकणंगले) हे दोघे युवक जागीच ठार झाले.याबाबत माहिती अशी की, सुरज व शितल हे दोघे दुचाकीवरुन भरधाव वेगाने निघाले होते. कोल्हापूर -सांगली राज्य मार्गावर मालेफाटा नजिक एका वृद्धेला चूकविणाच्या प्रयत्नात दुचाकी घसरली. दुचाकी वेगाने असल्याने यात सुरज व शितल यांचा जागीच मृत्यू झाला.तर या अपघातात वृद्धाही गंभीर जखमी झाली. जखमी वृद्धेस उपचारासाठी कोल्हापुरातील सी.पी.आर. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
वृद्धेला चुकविणाच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी घसरली, दोघे जागीच ठार; मालेफाटा नजिक अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 18:56 IST