हुपरी : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२६) चिन्हे वाटप झाली. यावेळी युवक क्रांती व शिवशाहू आघाडीला एकच शिटी चिन्ह दिल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला. यामुळे गोंधळ निर्माण झाला. मात्र, शिटी या एकाच चिन्हावर दोन्ही आघाड्या ठाम होत्या. आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांच्या आक्षेपाचा निषेध करीत आंदोलनाचा इशारा दिला. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारी यांनी निर्णय चुकला असल्याची कबुली देत युवक क्रांतीला शिट्टी व शिव शाहू आघाडीला छत्री चिन्ह दिल्याचे जाहीर केले.निवडणूक कार्यालयात सकाळी अकरा वाजता चिन्ह वाटप करण्यासाठी सर्व पक्ष आघाडी व अपक्षांना चिन्ह वाटप करण्यासाठी बोलवण्यात आले होते. यावेळी युवक क्रांती व शिवशाही आघाडी या दोन्ही आघाड्यांना नगराध्यक्षपदासह शिट्टी चिन्ह देण्यात आले होते. यावर उपस्थित असलेल्या कोणत्याही पक्ष, आघाडी अथवा अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतला नव्हता. मात्र नंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व उमेदवारांनी या चिन्ह वाटपावर आक्षेप नोंदवला. यावर विचारविनिमय करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता सर्व अपक्ष व पक्षाच्या उमेदवारांना बोलावून वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार शिवशाहू आघाडीला शिटी चिन्ह वाटप चुकीचे झाले आहे ते बदल करण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली मोठ्या प्रमाणात प्रवेशद्वाराजवळ जमाव एकत्र होत निषेध व संविधानाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काहीकाळ तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णयात बदल करून आघाडीतील युवक क्रांतीला शिट्टी, शिव शाहू आघाडीला छत्री चिन्ह दिल्याचे जाहीर केले. नाईलाजास्तव आघाडीचे कार्यकर्ते मागे फिरले. यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीलाच गोंधळ निर्माण झाल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.अधिकारी, पदाधिकाऱ्यात शाब्दिक चकमक यातून मार्ग काढण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिलारी, मुख्याधिकारी अजय नरळे, पीआय निंगाप्पा चौखंडे यांच्यासह शिव शाहू व युवक क्रांती आघाडीचे पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चेदरम्यान शाब्दिक चकमक उडाली. कुणाच्या दबावाखाली निर्णय फिरवला असा जाब विचारत सगळेच आक्रमक झाले.
Web Summary : Symbol allocation errors in the Kolhapur local body election caused disputes between two alliances, leading to verbal clashes and eventual reversals by election officials after protests.
Web Summary : कोल्हापुर स्थानीय निकाय चुनाव में प्रतीक आवंटन त्रुटियों के कारण दो गठबंधनों के बीच विवाद हुआ, जिसके कारण विरोध के बाद चुनाव अधिकारियों द्वारा मौखिक झड़पें और अंतिम बदलाव हुए।