शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या प्रवाशांकडून कोल्हापुरातील आगारांना दोन कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:12 IST

एस. टी. संघटनांनी मागे घेतलेल्या संपानंतर पुन्हा एकदा एस.टी.वर विश्वास दाखवित परतीच्या प्रवाशांकडून कोल्हापूर विभागास फक्त दोन दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातर्फे १५० जादा गाड्यांचे नियोजनअनेक मार्गांवरील एस.टी.चे आरक्षण होते तुडुंबनव्याने दाखल झालेल्या ‘शिवशाही’ला मागणी

कोल्हापूर , दि. २५ : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत एस. टी. संघटनांनी मागे घेतलेल्या संपानंतर परतीच्या प्रवाशांनी पुन्हा एकदा एस.टी.वर दाखविलेल्या विश्वासामुळेच परतीच्या प्रवाशांकडून कोल्हापूर विभागास फक्त दोन दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. कोल्हापुरातील सर्व आगारांत प्रवाशांची गर्दी झाल्याने प्रशासनातर्फे १५० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी एस. टी. कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत पुकारलेला संप चार दिवसांनंतर मागे घेण्यात आला. त्यामुळे शनिवारी (दि. २१) भाऊबीजेदिवशी पहाटेपासून एस. टी. बसगाड्या रस्त्यांवरून धावू लागल्या; पण प्रवाशांना याची पुरेशी कल्पना नसल्याने सकाळपर्यंत गर्दी कमी होती. दुपारी मात्र भाऊबीजेची गर्दी वाढली. तथापि महामंडळास दिवाळीदिवशी अपेक्षित असे उत्पन्न मिळाले नाही.

रविवार व सोमवारी (दि. २२ व २३) परतीच्या प्रवाशांनी एस. टी.ला चांगली साथ दिल्याने अनेक मार्गांवरील एस.टी.चे आरक्षण तुडुंब झाले होते. प्रवाशांची गर्दी पाहता, कोल्हापूर विभागाच्या वतीने ग्रामीण भागांतून तालुका स्तरावर, तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर १५० गाड्यांचे नियोजन करण्यात आले.

यामध्ये पुणे, सातारा, सांगली, मुंबई, इचलकरंजी, बेळगावासह कोकणातील गाड्यांना जादा गर्दी झाली होती. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागास दोन कोटींचे उत्पन्न मिळाले.नव्याने दाखल झालेल्या ‘शिवशाही’ला मागणीया काळात नव्याने दाखल झालेल्या शिवशाही बसेसना सर्वाधिक मागणी दिसून आली. पुणे-मुंबई मार्गावरील सर्व शिवशाही बसेसचे सर्व आरक्षण तुडुंब झाले होते. वातानुकूलित असलेल्या या बसचे भाडे परवडणारे असल्याने अनेकांनी आपला मोर्चा या बसकडे वळविला आहे.

 

एस.टी.ला प्रवाशांनी पहिली पसंती दिली; त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी कोल्हापूर विभागाने १५० जादा गाड्यांचे नियोजन केले होते. सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक कामामुळेच दोन दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न कोल्हापूर विभागास मिळाले आहे.- अतुल मोरे,  सहायक वाहतूक अधीक्षक

कोल्हापूर विभागातील आकडेवारी

तारीख                     किलोमीटर                                                   उत्पन्न 

  1. २२ आॅक्टोबर             २ लाख ५८ हजार किलोमीटर              ८२ लाख ३७ हजार
  2. २३ आॅक्टोबर             २ लाख १० हजार किलोमीटर              १ कोटी १७ लाख ६ हजार

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ