शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या दोन चोरटयाना अटक, सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:43 IST

कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या दोन चोरट्यांना जयसिंगपूर ते कोल्हापूर या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी विभागाच्या पोलिसानी ताब्यात घेतले. त्याचे कडून सुमारे २४ तोळे सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देघरफोडी करणाऱ्या दोन चोरटयाना अटक २४ तोळे सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त

कोडोली -कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केलेल्या दोन चोरट्यांना जयसिंगपूर ते कोल्हापूर या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी विभागाच्या पोलिसानी ताब्यात घेतले. त्याचे कडून सुमारे २४ तोळे सोन्यासह १० लाख ४८ हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कस्टडी देणेत आली आहे. संतोष सिध्दू पुजारी (वय ३५, रा. वडणगे ता.करवीर)  व राहुल उत्तम देवकर (वय २४, रा. मांगले ता. शिराळा, जि.सांगली) अशी आरोपींची नावे आहेत.दि २६ सप्टेंबर २० रोजी हे दोघेजण जयसिंगपूर ते कोल्हापूर या मार्गावरून दोन चाकी गाडीवरून चोरीचे सोन्याचे दागिने घेवून विक्री साठी जाणार असल्याची माहिती मिळाली होती. इंचलकरंजी विभागाचे सपोनि विकास जाधव यांनी सापळा रचून आरोपी पुजारी व देवकर यांना ताब्यात घेतली. त्यांची सखोल अगझडती घेतले असता त्यांच्याकडे ९ तोळे सोने, दोन मोटारसायकल व दोन मोबाईल असा ४ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल सापडला. 

या दोघांना पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखले व वारणानगर येथे दोन घरफोडी केल्याचे कबुल केले. चोरट्याने केलेले गुन्हे कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने त्यांना कोडोली पोलिसाच्या ताब्यात देणेत आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे.

आरोपीच्या कडे संयुक्तपणे तपास केला असता त्यांच्याकडून दाखल असलेल्या दोन घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील उर्वरीत मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. संशयित आरोपींच्याकडून चोरीतील चोवीस तोळे सोने व इतर मुद्देमाल असा एकूण १० लाख ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संशयित आरोपी संतोष पुजारी यांचेवर या पूर्वी दरोडा, घरफोडी मोटार सायकल चोरी असे विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी इचलकरंजीचे सपोनि विकास जाधव, कोडोलीचे सपोनि सुरज बनसोडे, उप निरीक्षक नरेन्द्र पाटील, फौजदार खंडेराव कोळी, महेश खोत, विश्वास चिली आदीने काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर