शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 15:50 IST

कोल्हापूर, दि. २६ : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात सरासरी १२.४0 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात पडला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.भोगावती नदीपात्रात प्रतिसेंकंद ५0५६ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरु असून सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. १२ वाजून ५0 मिनिटांनी गेट क्रमांक ...

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाराजाराम बंधाºयावरील पाणीपातळी १६ फूट तुळशी, कडवी, दुधगंगा , जंगमहट्टी, घटप्रभा पूर्ण भरले

कोल्हापूर, दि. २६ : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात सरासरी १२.४0 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात पडला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.भोगावती नदीपात्रात प्रतिसेंकंद ५0५६ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरु असून सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी धरण पूर्ण क्षमतेने भरले. १२ वाजून ५0 मिनिटांनी गेट क्रमांक ३ तर १ वाजून ५ मिनिटांनी गेट क्रमांक ६ उघडले गेले आहेत. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. यापूर्वी २४ आगॅस्ट २0१५ मध्ये अशीच स्थिती झाली होती.प्रतिसेकंद पाच हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरु झाला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२४ तासात पडलेल्या पावसाची नोंद

हातकणंगले १.७५, पन्हाळा ७.२८, शाहूवाडी १७.८३ राधानगरी १६.८३, गगनबावडा ५0, करवीर ६.२७, कागल ६.१६, गडहिंग्लज २.७१, भुदरगड १६.६0, आजरा १४.७५ व चंदगडमध्ये ८.६७ मि.मी. अशी नोंद झाली आहे.काल दिवसभरात जिल्ह्यात १४८.८३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून जूनपासून आतापर्यंत एकूण १0४९६.९६ मि. मि. पाऊस झाला आहे.

जिल्हयातील धरण पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी ७ च्या नोंदीनुसार धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाºयांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे.

राधानगरी - ८.३५ (८.३६१ टी. एम. सी), तुळशी ३.४७ (३.४७१ टी. एम. सी), वारणा ३३.८८ (३४.३९९ टी. एम. सी), दुधगंगा २२.७१ (२५.३९३ टी. एम. सी), कासारी २.६८ (२.७७४ टी. एम. सी), कडवी २.५१ (पूर्ण भरले), कुंभी २.७0 (२.७१५ टी. एम. सी), पाटगाव ३.५२ टी. एम. सी (३.७१६ टी. एम. सी), चिकोत्रा 0.५८ (१.५२२ टी. एम. सी), चित्री १.८१ (१.८८६ टी. एम. सी), जंगमहट्टी १.२२ (पूर्ण भरले), घटप्रभा १.५६ (पूर्ण भरले), जांबरे 0.७९ (0.८२0 टी. एम. सी ) आणि कोदे ल. पा. 0.२१ (पूर्ण भरले).

पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाºयावरील पाणीपातळी १६ फूट ६ इंच, सुर्वे १८ फूट ४ इंच, रुई ४३ फूट ३ इंच, इचलकरंजी ४0 फूट, तेरवाड ३७ फूट , शिरोळ २९ फुट ३ इंच, नृसिंहवाडी २४ फूट ३ इंच इतकी आहे.