शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

चौथीतील विद्यार्थ्यांनी लिहिली २0 पुस्तके

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 05:07 IST

अनुभव, कल्पना विस्तारावर आधारित गोष्टीची २0 पुस्तके कोल्हापुरातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीमधील नेहरू विद्यालयाने राबविला आहे.

- संतोष मिठारीकोल्हापूर - अनुभव, कल्पना विस्तारावर आधारित गोष्टीची २0 पुस्तके कोल्हापुरातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीमधील नेहरू विद्यालयाने राबविला आहे.सध्या मुले मोबाईलमध्ये जास्त रमत आहेत. अशा स्थितीत त्यांना स्वत: गोष्ट लिहून पुस्तक तयार करायला लावणे. त्यांच्यातील लेखकाचा शोध घेण्यासह त्यांच्या बुद्धीला चालना देण्याचा उपक्रम महाराणी शांतादेवी गायकवाड गृहनिर्माण शिक्षण संस्थेच्या नेहरू विद्यालयाने राबविला आहे. उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील चौथीच्या २० विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील भाषाविषय साहाय्यक निशा काजवे आणि वर्गशिक्षिका सारिका पाटील यांनी प्रशिक्षण दिले. क्वेस्टअंतर्गत या विद्यार्थ्यांना पुस्तक लेखनाचे प्रशिक्षण देण्यात आले.‘आनंदी विद्यालय’ उपक्रमही राबविण्यात आला. प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांकडून पुस्तके लिहून घेण्यात आली. नारळ महागला, मदत का? करावी, शिक्षा कोणाला, चूक कोणाची, मदतीचा हात अशा विविध २० गोष्टींचे लेखन या विद्यार्थ्यांनी स्वानुभव आणि कल्पनाविस्तारावर आधारित केले.उपक्रमातील सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनीनी कार्डशीटपेपरवर गोष्टी लिहून पुस्तके तयार केली आहेत. त्यामध्ये त्यांनी पूरक चित्रेही रेखाटली आहेत. आठ ते १0 पानांची पुस्तके आहेत.या गोष्टीच्या पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:चे विचार, कल्पना मांडल्या आहेत. गोष्टीचे पुस्तक लिहिण्याचा हा उपक्रम आता प्रायोगिक तत्त्वावर वर्गपातळीवर राबविला असून, पुढील टप्प्यात शाळा पातळीवर राबविण्याचा मानस आहे. - सारिका पाटील, वर्गशिक्षिका

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र