शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

अडीचशे जनावरे, वीस हजार कोंबड्या महापुरात गडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:20 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या ...

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या प्रलयकारी महापुराने पुरते जनजीवन उद्ध्वस्त झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. अडीचशेहून अधिक जनावरे पुराच्या पाण्यात दगावल्याने गोठेच्या गोठे ओस पडले आहेत. पोल्ट्री उद्योगाचेही मोठे नुकसान झाले असून, तब्बल १९,५३० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. ओढे, नाले, नद्यांच्या पुराचे पाणी पात्रात जाईल असे झाडे, नाल्यात मृत जनावरांचे सांगाडे अडकलेलेदिसत असल्याने हा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.शेतीला जोडधंदा म्हणून दूध व कुक्कुटपालन व्यवसायास ग्रामीण भागात सुरूवात झाली. पण लहरी हवामान व शेतीमालाच्या दरातील अनिश्चितेमुळे शेती अडचणीत आली त्यावेळी दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले. किंबहुना दूधामुळेच शेतकºयांचे संसार उभे राहिले. त्यामुळे गेल्या दहा वर्षात पशुधनात दीडपटीने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सुमारे आठ लाख दूभती जनावरे असून गावागावात कुकुटपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो.गेल्या आठवड्यात झालेल्या धुवांदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सुपाने ओतणारा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि अंगात हुडहुडी भरवणारी थंडीने माणसांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते, तिथे मुक्या पशु-पक्षांची तर दैना उडाली होती. या वातावरणाने पोल्ट्रीचे मोठे नुकसान झाले. या आठ दिवसांत जिल्ह्यात १९५३० कोंबड्या दगावल्या असून सर्वाधिक ८६७० कोंबड्या गडहिंग्लज तालुक्यातील आहेत. पोल्ट्री उद्योगावर अस्मानी संकट कोसळल्याने पोल्ट्री चालक हवालदिल झाले आहेत.पोल्ट्री उद्योगाबरोबरच जनावरांनाही पुराचा झटका बसला. पुराच्या पाण्यात जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक जनावरे मृत्यूमुखी पडली. आतापर्यंत २५४ जनावरांची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला यश आले असून ओढे, नाले, नद्यांना आलेल्या पुराचे पाणी पात्रात जाईल, तशी मेलेल्या जनावरांचे सांगाडे दिसू लागले आहेत. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुका पशुधन कुक्कुटपक्षीकरवीर ७४ -शाहूवाडी १३ -गगनबावडा ९ -पन्हाळा ३५ -कागल ७ -गडहिंग्लज १२ ३७००चंदगड ६ -भुदरगड २ ८६७०राधानगरी १९ ८०आजरा ५ ३५००शिरोळ ३२ ३००हातकणंगले ४० ३२८०एकूण २५४ १९५३०नुकसान लाखातभरपाई हजारातराज्य सरकारने पुरात मृत्युमुखी पडलेल्या मोठ्या जनावरांना प्रत्येकी ३० हजार तर लहान जनावराला ३ हजार रूपये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.पुराच्या पाण्यात लाख रूपये किमंतीच्या गायी व म्हैशी वाहून गेल्या पण त्याची भरपाई हजारात मिळणार आहे.