शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन मान्सूनमध्ये वळवाचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 19:17 IST

ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पाऊस बरसत आहे. शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरासह काही तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. १० मिनिटे पाऊस झाला; मात्र त्याने सगळीकडे पाणीच पाणी केले.

ठळक मुद्देऐन मान्सूनमध्ये वळवाचा पाऊसशेतकऱ्यांची चिंता मात्र कायम

कोल्हापूर : ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पाऊस बरसत आहे. शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरासह काही तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. १० मिनिटे पाऊस झाला; मात्र त्याने सगळीकडे पाणीच पाणी केले.गेले आठ-दहा दिवस जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. उत्तर महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असून नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. मात्र कोल्हापुरात शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे, मात्र पाऊस पडेना. ढगाळ वातावरण असले तरी हवेत कमालीचा उष्मा जाणवत होता. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

दुपारी तीन वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस कोसळला. केवळ १० मिनिटे आडव्यातिडव्या पावसाने झोडपून काढले. त्यानंतर मात्र ऊन पडले. पावसाने सगळीकडे पाणीच पाणी करून सोडले. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी त्यानंतर पाऊस झाला.ऐन मान्सूनमध्ये वळवासारखा पडेल तिथेच पडेल असाच पाऊस असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिके माना टाकू लागली आहेत. भातपिकाला कायम पाणी लागते. ते नसल्याने पिके पिवळसर पडू लागली आहेत. वाढ खुंटल्याने उत्पादनावर परिणाम होणार हे निश्चित आहे.जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा, टीएमसीमध्ये असा-राधानगरी : ५.२७ (८.३६१), तुळशी : १.९४ (३.४७१), वारणा : २२.११ (३४.३९८), दूधगंगा : १६.६४ (२५.३९२), कासारी : १.७५ (२.७५२), कडवी : १.३७ (२.५१५), कुंभी : १.७९ ( २.७१३), पाटगाव : २.५९ (३.७१६). 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर