शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे

By सचिन जवळकोटे | Updated: November 9, 2025 15:29 IST

‘उदयनराजें’चा झिरो झिरो सेवन नंबर म्हणजे ‘जेम्स बॉण्ड’ची आठवण करून देणारा. ‘बाबाराजें’चा डबल वन डबल वन नंबर हा प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या पुढाकाराचं चित्र स्पष्ट करणारा.

-सचिन जवळकोटे (कार्यकारी संपादक, लोकमत कोल्हापूर)कोल्हापूर अन् बुलेट यांचं नातं तसं खूप जिव्हाळ्याचं. एकदम हार्ड विषय. मात्र, याच ‘कोल्हापूरचे पाटील’ चक्क ‘यामाहा’वर बसून फुल स्पीड पकडतात तेव्हा, त्यांचे व्हिडीओ होतात व्हायरल. ‘यंग जनरेशन’प्रमाणेच काही नेत्यांनाही वेगाचं आकर्षण असल्याचं यातून स्पष्ट झालेलं. मग बत्ती तर लागणारच. ‘दक्षिण महाराष्ट्रात’ल्या वेगवान नेत्यांची खास झलक.. अर्थात स्पीड लीडर. लगाव बत्ती..

दिवाळी सणाच्या धामधुमीत ‘कोल्हापुरा’त पळाल्या म्हशी. रंगवलेल्या. उधाणलेल्या. या सोहळ्यातल्या गलक्यात भुर्रभुर्रला ‘आरएक्स हंड्रेड’चा आवाज. या बाईकचं शूटिंग काढण्यासाठी सरसावले शेकडो मोबाईल; कारण यावर बसले होते चक्क ‘बावड्याचे बंटी’. खरं त्यांच्याकडे कोट्यवधींच्या गाड्या पण, वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच्या जुन्या ‘यामाहा’वर बसण्यात त्यांना जी मजा येत होती ती काही औरच. त्याला कारणही तसंच. ‘संजय अन् सतेज’ या दोन्ही बंधूंना कॉलेजमध्ये असताना मिळालेली हीच बाईक. ती आठवण त्यांनी कैक दशकांनंतर आज ताजी केलेली. ‘हातकणंगले’च्या ‘धैर्यशीलदादां’कडेही इम्पोर्टेड गाड्या. मात्र, ‘खासदार’ असूनही रोज सकाळी ‘सायकलिंग’ करण्यातच त्यांना अधिक इंटरेस्ट. लगाव बत्ती.. 

‘पालकमंत्री’ झाल्यानंतर ‘आबिटकर’ लाल दिव्याच्या गाडीत फिरू लागलेले. मात्र, पूर्वी ‘राधानगरी’त बाईकवर फिरतानाचा त्यांचा व्हिडीओ आजही कार्यकर्ते आवर्जून पाहू लागलेले. फेटा बांधून बुलेट चालवतानाचा त्यांचा जुना फोटो अनेकांनी जपून ठेवलेला. लगाव बत्ती..

कोल्हापूर ते नागपूर.. ‘महाडिक आप्पां’चं ड्रायव्हिंग !

‘लाँग टूर ड्रायव्हिंग’मध्ये याच कोल्हापुरातील ‘महाडिक आप्पां’चा हात कोणीच धरू न शकलेला. ते ‘आमदार’ असताना अधिवेशनासाठी ‘कोल्हापूर ते नागपूर’ नॉन स्टॉप स्वतः कार चालवत गेलेले. शहरातही कधी त्यांच्या गाडीनं ड्रायव्हर न बघितलेला. त्यांची ७४७४ क्रमांकाची गाडी साखर कारखान्यावर आली की कार्यकर्ते ओळखायचे. बरोबर संध्याकाळचे चार वाजलेले. लगाव बत्ती..

‘साताऱ्या’त तर दोन राजे. दोघांकडेही एकसे एक आलिशान गाड्या. दोघांचे फिक्स नंबरही ठरलेले. ‘उदयनराजें’चा झिरो झिरो सेवन नंबर म्हणजे ‘जेम्स बॉण्ड’ची आठवण करून देणारा. ‘बाबाराजें’चा डबल वन डबल वन नंबर हा प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या पुढाकाराचं चित्र स्पष्ट करणारा. ‘थोरले राजे’ आजही अधून-मधून बुलेटवर फिरतात. मात्र, पुण्याहून साताऱ्यात येताना जर ते स्वत: कार चालवत असतील तर आतल्या कार्यकर्त्यानं अख्खा प्रवास डोळे मिटूनच केलेला समजायचा. सातारच्या राजकारणात विरोधकांना दाबल्यासारखं जोरात एक्सिलेटर दाबायची म्हणे त्यांना खूप आवडीची सवय. ‘बाबाराजे’ मध्यंतरी चक्क रिक्षा चालवताना दिसलेले. चारचाकीतून उतरून थेट तीनचाकीत बसलेले. कदाचित सध्याच्या ‘तीनचाकी सरकार’मध्ये स्वतःची ‘मिनिस्ट्री’ सांभाळतानाची कसरत त्यांनी या रिक्षातून अनुभवलेली. 

‘म्हसवड’च्या ‘जयाभाऊं’चं वेगळेपण नेहमीच त्यांच्या लाइफस्टाईलमधून उठून दिसलेलं. आंधळी धरणाकाठचा त्यांचा आलिशान बंगला असो की, कॅनलच्या पाण्यात भिजताना ‘बाहुबली’ स्टाईल हात पसरलेली ॲक्शन असो. तेही कधी कधी गाडीमधून उतरून बुलेटवर फिरताना दिसलेले. मात्र, कार्यकर्त्यांच्या पाठीमागं बसूनच. लगाव बत्ती.. 

‘सांगली’त ‘विशालदादा’ हेही एका मोठ्या ऑटो शोरूमचे मालक. आजपर्यंत त्यांच्या कंपनीनं हजारो चारचाकी विकलेल्या, मात्र त्यांना स्वतःला गाडी कधीच चालवावीशी न वाटलेली. नाही म्हणायला एकदा एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर ‘ट्रॅक्टर’ त्यांनी चालवलेलं. तेवढंच काय ते ड्रायव्हिंग. ‘कडेगाव’ मतदारसंघातही ‘विश्वजितदादा’ अधूनमधून गाडी चालवताना मतदारांनी पाहिलेलं. मात्र, पूर्वी ‘हात’वाल्यांसोबत असलेल्या ‘इंदापूर’च्या ‘हर्षवर्धन दादां’ना घेऊन या ‘बाळासाहेबां’नी आपल्या गाडीचं स्वतः सारथ्य केलेलं. आता हे ‘पाटील’ दुसऱ्या पार्टीच्या गाडीत बसलेले, हा भाग वेगळा. 

‘पाटलां’वरून ‘ईश्वरपूर’ आठवलं. इथले ‘जयंतराव’ पूर्वी ‘घड्याळ’ एकसंध असताना चार बड्या नेत्यांना घेऊन स्वतःची गाडी चालवत फिरलेले. शेजारी ‘छगनराव’. पाठीमागे ‘बारामतीचे अजितदादा, नवी मुंबईचे गणेशदादा अन् परळीचे धनाभाऊ’. त्यावेळी त्यांनी या फोटोसह एक भावनिक पोस्ट केलेली, ‘जिवाभावाचे लोक सोबत असतील तर गाडी चालवण्याची मजा काही औरच.’.. पण काळाच्या.. माफ करा.. सत्तेच्या ओघात हे चौघेही या गाडीतून उतरून नव्या गाडीत गेलेले. जुन्या गाडीत ‘जयंतराव’ एकटेच राहिलेले. लगाव बत्ती..

English
हिंदी सारांश
Web Title : Speed Leader: Kolhapur's Patil and Satara's Royals' Driving Tales

Web Summary : South Maharashtra's leaders' love for speed: From vintage bikes to long drives, politicians showcase their passion for vehicles. Kolhapur's Patil on Yamaha, Satara's royals' fondness for fancy cars and driving skills, and other leaders' unique driving stories revealed.
टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेPrakash abitkarप्रकाश आबिटकरPoliticsराजकारण