शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
3
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
4
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
5
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
6
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
7
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
8
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
9
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
10
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
11
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
12
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
13
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
14
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
15
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
16
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
17
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
18
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
19
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
20
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे

तुरेवाला सर्पगरुड, मोरघार, लालपंखी होला पक्षिगणनेचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 4:07 PM

Birdwatching Kolhapur- दलदली हारीन, कैकर, तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, लाल पंखी होला या पक्ष्यांची नोंद 'बर्डस ऑफ कोल्हापूर' या ग्रुपने रविवारी केलेल्या कळंबा तलावावरील पक्षिगणनेचे आकर्षण ठरले.

ठळक मुद्दे'बर्डस ऑफ कोल्हापूर'चा सहभाग : १६ प्रजातींचे स्थलांतरीत पक्षीकळंबा तलावावर ९८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद

कोल्हापूर : दलदली हारीन, कैकर, तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, लाल पंखी होला या पक्ष्यांची नोंद 'बर्डस ऑफ कोल्हापूर' या ग्रुपने रविवारी केलेल्या कळंबा तलावावरील पक्षिगणनेचे आकर्षण ठरले.पक्षिगणनेत ९८ प्रजातींच्या ९७२ पक्ष्यांची नोंद झाली. यातील १६ प्रजाती या स्थलांतरीत पक्ष्यांच्या आहेत. जिल्ह्यातून ३0 पेक्षा जास्त पक्षीनिरीक्षकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. दलदली हारीन, कैकर, तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, लाल पंखी होला हे या पक्षिगणनेचे आकर्षण ठरले.'बर्डस ऑफ कोल्हापूर' या ग्रुपमार्फत कोल्हापूर शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या भागात पक्षिगणना करण्यास प्रारंभ झाला आहे. या पक्षीगणनेतून जमा झालेली माहिती 'वेटलॉंड इंटरनॅशनल' या पर्यावरणीय संघटनेच्या 'इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस' मध्ये नोंद करण्यात येत आहे.कोल्हापूरात दर रविवारी विविध परिसरात ही पक्षिगणना होणार आहे. पुढील गणना दि. १0 जानेवारी २०२१ रोजी सकाळी ६.४५ पासून राजाराम तलावावर केली जाणार आहे, अशी माहिती या ग्रुपचे समन्वयक प्रणव देसाई आणि सतपाल गंगलमाले यांनी दिली. या पक्षिगणनेमध्ये कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील, पक्षीनिरीक्षकांनी सहभाग नोंदवला.पक्षीतज्ञ आशिष कांबळे, ज्येष्ठ पक्षीमित्र दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झ्रालेल्या या पक्षिगणनेत बर्डस ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई, सत्पाल गंगलमाले, अभिषेक शिर्के, पृथ्वीराज सरनोबत आदी पक्षिनिरिक्षक सहभागी झाले होते.संकटग्रस्त प्रजातींचीही नोंदआययूसीएनने संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तिरंदाज, नदी सुरय, काळ्या डोक्याचा शराटी या प्रजातीही या तलावावर आढळल्या. या तलावाकडे नाम्या हा रहिवासी पक्षी, तसेच स्थलांतरित बदक मात्र आढळून आले नाहीत.

अन्नसाखळीच्या टोकाला असणाऱ्या विविध पक्ष्यांची उपस्थिती असणं यातूनच कळंबा तलाव जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असल्याचे सिध्द करते आहे.- सतपाल गंगलमाले,समन्वयक, बर्डस ऑफ कोल्हापूर

 

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण