शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
4
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
6
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
8
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
9
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
10
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
11
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
12
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
13
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
14
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
15
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
16
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
17
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
18
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
19
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

महाराष्ट्राच्या एकसंघतेसाठी तुकोबांची गाथा गरजेची

By admin | Updated: April 5, 2017 00:48 IST

शिवाजीराव भुकेले : मुरगूडला सदाशिवराव मंडलिक आणि विजयामाला मंडलिक स्मृती व्याख्यानमाला

मुरगूड : महाराष्ट्र संस्कृतीत संत परंपरेच्या विरोधात ठामपणे लढणारा कुणबी संत मानवतावाद आणि साम्यवादाचा कृतिशील पुरस्कर्ता संत म्हणजेच तुकाराम होय. तुकोबांच्या अभंगांनी महाराष्ट्र अखंड राहिला आहे. एकात्मतेसाठी तुकोबांचे कार्य डोंगराएवढे आहे. संप्रदाय बंदिस्त कुंपणात अडकल्यामुळेच तुकोबांनाही संप्रदायी म्हणता येणार नाही. सध्या तुकोबांना समाजाने विशिष्ट धर्माच्या चौकटीत बंदिस्त केले आहे. संत परंपरेतील सर्वांत साधक अवस्था त्यांची होती; त्यामुळेच तुकोबांचे साडेचार हजार अभंग गाथा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आरसा आहे. म्हणूनच महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी तुकोबांची गाथा गरजेची आहे, असे मत संत साहित्यक डॉ. शिवाजीराव भुकेले यांनी व्यक्त केले. मुरगूड येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्यावतीने दिवंगत सदाशिवराव मंडलिक आणि विजयामाला मंडलिक स्मृती व्याख्यानमालेत तुका आकाशाएवढा या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, बिद्रीचे माजी संचालक विजयसिंह मोरे, सत्यजित जाधव प्रमुख उपस्थित होते. भुकेले म्हणाले, संस्काराचे विद्यापीठ असणारी कुटुंबव्यवस्था संत तुकोबांचे विचार आणि थोर संस्कारामुळेच वाचेल. तुकोबांच्या गाथ्यांनीच महाराष्ट्र अभंग राहिला आहे. तुकोबांना आम्ही आध्यात्मिक करून समाजशीलतेच्या जाणीवेपासून दूर केले आहे. बहुजनांची व्यथा, कथा चित्रित करणारा चित्रफलक म्हणजे तुकोबांचे विचार होय. ते मानवाला जगण्याचा वस्तुपाठ म्हणून उपयोगी आले. परंपरागत विचारसरणीच्या प्रस्थापितांना विचारपूर्वक धक्का देत त्यांनी समाजाच्या हिताची भूमिका प्रत्यक्ष कृतीतून व अभंगातून मांडली. म्हणूनच एकविसाव्या शतकातही तुकोबा आम्हाला मार्गदर्शकच आहेत, असेही त्यांनी सांगितले. पी. डी. मगदूम यांच्या हस्ते पाहुण्यांच्या सत्कार झाला. मंडलिक आखाड्याची महिला मल्ल नंदिनी साळुंखे व स्वाती शिंदे, अंकिता शिंदे यांचा वाचनालयाच्या वतीने सत्कार झाला. स्वागत प्रा. महादेव सुतार यांनी तर प्रास्ताविक अनिल सिद्धेश्वर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. आभार संतोष कुडाळकर यांनी मानले. माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, नगरसेवक रवीराज परीट, सुप्रिया भाट, संगीता चौगले, संभाजी आंगज, सुनीता कळंत्रे, अमर पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)