शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळाला ‘टुबी’ परवाना धनंजय महाडिक : वाहतूक संचालनालयाने पाठविली प्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:20 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातून विमान वाहतूक सुरू होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘टूबी’ हा डे आॅपरेटिंग परवाना प्रलंबित होता.

कोल्हापूर : कोल्हापुरातून विमान वाहतूक सुरू होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला ‘टूबी’ हा डे आॅपरेटिंग परवाना प्रलंबित होता. तो पूर्वनिर्धारित १६ डिसेंबर या तारखेच्या मुदतीपेक्षा एक दिवस आधी मिळाला आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली.

एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्ली येथील सेंट्रल हेडक्वार्टर येथे या परवान्याची प्रत पाठविली असल्याचे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे बी. एस. भुल्लर यांनी कळविले आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून डे आॅपरेशन्स निर्धारित वेळेत सुरू होणार, हे निश्चित झाले आहे. डे आॅपरेटिंग परवाना मिळविण्यासाठी कोल्हापूर विमानतळाच्या अधिकारी पूजा मूल व कर्मचाºयांनी विशेष प्रयत्न केले. कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा प्रारंभ २४ डिसेंबरपासून होणार आहे. यापूर्वी बुधवारी (दि. २०) विमानोड्डाणाची पूर्वचाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी हा परवाना मिळणे महत्त्वाचे आहे. या परवान्यासाठी मी आग्रही होतो, अशी माहिती महाडिक यांनी दिली.विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुकतब्बल सहा वर्षांनंतर कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरला सुरू होणार आहे. या पहिल्या विमानाने जाण्यासाठी शंभरजण उत्सुक आहेत. त्यांनी प्राथमिक स्वरुपातील नोंदणी विविध प्रवासी वाहतूक सेवा पुरविणाºया संस्थांकडे केली आहे. विमानसेवा प्रारंभाबाबत कोल्हापूरकरांमध्ये उत्साह आहे.कोल्हापूरच्या विमानसेवेसाठी ‘एअर डेक्कन’चे १८ आसनी विमान असणार आहे. ‘उडान’अंतर्गत यातील पहिल्या दहा जागांचा तिकीट दर अडीच हजार ते तीन हजार रुपये असणार आहे. उर्वरीत आठ जागांसाठी सहा ते सात हजार रुपये दर असेल.

दरम्यान विमानसेवेसाठी तिकीट नोंदणीची प्रक्रिया आॅनलाईन असणार आहे. एअर डेक्कन कंपनीचे संकेतस्थळ अथवा तिकीट नोंदणीची सेवा देणाºया अ‍ॅप्सचा वापर करावा लागणार आहे. अधिकृतरीत्या नोंदणीची प्रक्रिया २१ डिसेंबरपासून सुरू होईल. येथील उद्योजक, व्यापारी आणि कोल्हापूरकरांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा. नियमितपणे येथे सेवा सुरू राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया ट्रेड विंग्ज् लिमिटेडचे विभागीय व्यवस्थापक बी. व्ही. वराडे यांनी दिली.

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर