शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

‘सीपीआर’मध्ये क्षयरोगाचे बनावट दाखले

By admin | Updated: May 18, 2016 00:25 IST

रॅकेट कार्यरत : प्रशासनातील काहींचा सहभाग; एसटीचे काही कर्मचारीही सामील; मुख्य सूत्रधार शोधण्याची गरज

कोल्हापूर : सीपीआरमध्ये ३० ते ५० हजार रुपये घेऊन टी. बी. (क्षयरोग) बाधित बनावट दाखले देणारे रॅकेट कार्यरत असून याद्वारे राज्य परिवहन मंडळातील काहींनी एक वर्ष बसून पगार खाल्ला आहे, तर काहीजण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या रॅकेटमध्ये सीपीआर प्रशासनातील कर्मचाऱ्यांबरोबरच परिवहन मंडळातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणाबाबत मंगळवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे (सीपीआर) प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले.राज्य परिवहन महामंडळाच्या साधारण २० कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी ५० हजार रुपये या रॅकेटला देऊन क्षयरोग झाल्याबाबतची बनावट प्रमाणपत्रे घेतल्याची शंका आहे. या बनावटगिरीला सीपीआरमधील काही कर्मचारी तसेच परिवहन मंडळातील तथाकथित काही नेत्यांची साथ असल्याचे समजते. मात्र, या प्रकरणात सीपीआर प्रशासन मुळाशी जाऊन याचा शोध घेत नसल्याचा जाब पवार यांनी डॉ. पाटील यांना विचारला. दरम्यान, गतमहिन्यात लक्ष्मीपुरी पोलिसांत बनावट क्षयरोग दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे, त्याचा तपास कुठंपर्यंत गेला आहे, अशी विचारणा संजय पवार यांनी डॉ. पाटील यांच्याकडे केली. त्यावर तपास अधिकाऱ्यांना याठिकाणी बोलावून घ्यावे, अशीही मागणी केली.थोड्या वेळाने तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक मनीषा गबाले याठिकाणी आल्या. त्यांनी या प्रकरणात चार संशयित आरोपी आहेत. त्यापैकी तिघांनी अटकपूर्व जामीन घेतला आहे. मी एक महिना प्रशिक्षणाला गेल्यामुळे हा तपास झाला नव्हता. आता त्यातील मुख्य सूत्रधाराच्या लवकरच मुसक्या आवळू, असे सांगून तपासासाठी सीपीआर प्रशासनाने प्रमाणपत्रांवर जे शिक्के आहेत, त्या शिक्क्यांची पडताळणी करण्यासाठी पोलिसांना शिक्के उपलब्ध करून दिले नसल्याचे निदर्शनास आणून दिले.हे ऐकून शिष्टमंडळाने डॉ. पाटील यांना धारेवर धरले. पोलिसांना तपासकामी शिक्के उपलब्ध करून द्यावेत, नाही तर त्यांना आताच सहआरोपी करावे, अशी मागणी करून बनावट क्षयरोग दाखला प्रकरणी निष्क्रिय अधिकाऱ्यांना शोधून काढून कारवाई करावी, अशी मागणी केली.शिष्टमंडळात शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, संदीप पाटील, रणजित आयरेकर, हर्षल पाटील, दिलीप देसाई, विकास नेसरीकर, शैलेश पुणेकर, शुभांगी साळोखे, पूजा सोहनी, दीपाली शिंदे, सुमन शिंदे, कमलताई पाटील, रेहाना खान आदींचा सहभाग होता.प्रकरणाची व्याप्ती मोठीबनावट क्षयरोग प्रमाणपत्राची व्याप्ती मोठी असून सीपीआरमध्ये रोज वावरणारा एक एजंट याचा सूत्रधार असल्याचे समजते. त्याला सीपीआरमधील कर्मचाऱ्यांची साथ असून परिवहन मंडळातील काही तथाकथित नेत्यांनी सावज हेरुन या साखळीत अडकविल्याचे समजते. यापैकी काहीजणांनी या प्रमाणपत्राचा लाभ घेतला असून काहीजण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना पकडणे गरजेचे आहे. बनावट क्षयरोग दाखल्यांबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सातपैकी सहा जणांनी अशाप्रकारचे दाखले घेतल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याच्या मुळाशी जाऊन तपास करू.- डॉ. एल. एस. पाटील, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर