शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडे वस्त्रोद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करा-प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 01:01 IST

इचलकरंजी : मंदीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतीखालोखाल रोजगार देणारा हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देशरद पवारांना विनंती : बारामती येथे शिष्टमंडळांची भेटवस्त्रोद्योगाला पुनरुज्जीवन मिळण्यासाठी विजेच्या दरात सवलत देऊन सर्व करासहीत प्रतियुनिट दोन रुपये दराने वीज द्यावीभविष्यात अशीच परिस्थिती आणखीन काही दिवस राहिली तर हा उद्योग कोलमडून पडेल

इचलकरंजी : मंदीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतीखालोखाल रोजगार देणारा हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी आपण सरकारकडून प्रयत्न करावेत, अशी विनंती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी याबाबत शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

बारामती येथे आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली. त्यावेळी वस्त्रोद्योगातील सद्य:परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. भाजप सत्तेवर आल्यापासून वस्त्रोद्योगातील सर्व योजना बंद केल्या आहेत. टफ्स योजनेंतर्गत मिळणारे अनुदान ३० टक्क्यांवरून १० टक्के केले आहे ते पूर्ववत करावे. इपीएफची सक्ती केली जात आहे. मात्र, शहरातील कारखानदारांचे एका शेडमध्ये वेगवेगळ्या मालकांचे यंत्रमाग असल्याने हा कायदा लागू होत नाही. त्यामुळे तो सरसकट लागू करू नये.

वस्त्रोद्योगाला पुनरुज्जीवन मिळण्यासाठी विजेच्या दरात सवलत देऊन सर्व करासहीत प्रतियुनिट दोन रुपये दराने वीज द्यावी. यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याजामध्ये सात टक्के अनुदान द्यावे. कामगार कल्याण मंडळाची स्थापना करावी, आदी मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली. प्रत्येक वेळी या शासनाकडून आश्वासने मिळाली आहेत. मात्र, अंमलबजावणी होत नाही.भविष्यात अशीच परिस्थिती आणखीन काही दिवस राहिली तर हा उद्योग कोलमडून पडेल. त्यामुळे या उद्योगाबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या मागण्यांची सोडवणूक करावी, अशी विनंतीकेली.शिष्टमंडळात सुनील पाटील, विलास गाताडे, सतीश कोष्टी, राहुल आवाडे, महेश पाटील, विश्वनाथ अग्रवाल, आदींचा समावेश होता.

टॅग्स :MarketबाजारPower Shutdownभारनियमन