शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त: बदलीची राज्यभर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 18:18 IST

कोल्हापूर येथील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांची नियुक्ती झाल्याची चर्चा शुक्रवारी राज्यभर होती. याप्रकरणी गृह विभागाकडून अधिकृत आदेश प्राप्त झाला नसल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देविश्वास नांगरे-पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त: बदलीची राज्यभर चर्चाप्रकाश मुत्याळ नवे पोलीस महानिरीक्षक

कोल्हापूर : येथील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांची नियुक्ती झाल्याची चर्चा शुक्रवारी राज्यभर होती. याप्रकरणी गृह विभागाकडून अधिकृत आदेश प्राप्त झाला नसल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.औरंगाबाद येथून बदली झाल्यानंतर १२ जुलै २०१६ मध्ये नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ‘पोलीस प्रशासन आणि कायदा सुव्यवस्था’ चांगल्या प्रकारे हाताळली.

परिक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीणमध्ये पोलीस ठाण्यांत नेहमी दाखल होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्रपणे पोलीस मुख्यालयासह ‘तक्रार निवारण कक्ष’, स्थापन करून १४६ पोलीस ठाण्यांत दर शनिवारी तक्रार निवारण दिन सुरू केला.

परिक्षेत्रामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी २०० पेक्षा जास्त गुन्हेगारी टोळ्यांना मोका लावला. गुन्हेगार-आदान-प्रदान कार्यक्रम, गुन्हे दोष सिद्धेचे प्रमाण वाढविणे, वाहतूक समस्या दूर करणे, प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या बदलीने नाशिककरांना एक सक्षम आणि चांगला अधिकारी मिळाला आहे. नांगरे-पाटील यांचे गाव बत्तीस शिराळा तालुक्यातील कोकरूड. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांची बदली निश्चित होती. ‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्त दिले होते.मुत्याळ यांच्या नावाची चर्चाकोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांची अप्पर पोलीस महासंचालकपदी बढतीवर मुंबईला बदली झाली. त्यानंतर दोन महिने येथील कार्यभार नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांनी सांभाळला होता. त्यांनी यापूर्वी सातारा पोलीस अधीक्षकपदी काम केल्याने परिक्षेत्रातील सामाजिक, राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्राचा अभ्यास त्यांना आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीkolhapurकोल्हापूर