पन्हाळा : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळनजीक भरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कसबा बावडा येथील दोन तरूण जागीच ठार झाले. काल मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन आबासाहेब रणदिवे, ( वय ३०, रा. रणदिवे गल्ली) व विशाल आबासाहेब हाके, (वय २९, रा. कवलापूर जि. सांगली) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.अशोक महादेव पोवार (रा.मलकापुर) याचे ट्रकने निष्काळजीपणाने चालवत मोटरसायकलला समोरुन जोरदार धडक दिल्याने हा आपघात झाल्याची नोंद पन्हाळा पोलीस ठाण्यात झाली असुन ट्रकचालक अशोक पोवार यास अटक केली आहे. त्याला न्यायालयाने जामिन मंजुर केला आहे.विशाल याचा दहा दिवसापूर्वीच विवाह झाला होता. तो बावडा येथे मामाकडे रहायला होता. विशालची पत्नी लग्नानंतर माहेरी गेली असुन, ती परत येण्यापूर्वीच पतीच्या निधनाची बातमी तिला ऐकण्याची वेळ आली.नितीन रणदिवे हा बावडा परिसरातील नावाजलेला क्रिकेटपटू होता, तो विवाहित असून त्याला एक लहान मुलगा आहे.नितीन व विशाल हे दोघे काल रात्री दुचाकीवरून विशाळगडकडे चालले होते. वाघबीळच्या पुढे आशिष लॉजच्या समोरील वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरघाव ट्रकने जोराची धडक दिली, त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने बावडा परिसरावर शोककळा पसरली आहे.
वाघबीळनजीक भरघाव ट्रकची दुचाकीला धडक, कसबा बावडा येथील दोन तरूण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:25 IST
Accident Kolhapur- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळनजीक भरघाव ट्रकची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात कसबा बावडा येथील दोन तरूण जागीच ठार झाले. काल मध्यरात्री बाराच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन आबासाहेब रणदिवे, ( वय ३०, रा. रणदिवे गल्ली) व विशाल आबासाहेब हाके, (वय २९, रा. कवलापूर जि. सांगली) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.
वाघबीळनजीक भरघाव ट्रकची दुचाकीला धडक, कसबा बावडा येथील दोन तरूण ठार
ठळक मुद्देवाघबीळनजीक भरघाव ट्रकची दुचाकीला धडककसबा बावडा येथील दोन तरूण जागीच ठार