शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur news: भंगारातील ट्रकच्या डिझेल टाकीचा स्फोट, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:10 IST

स्फोटाने परिसर हादरला

गांधीनगर : भंगारातील ट्रकचे लोखंड काढताना गॅस कटरची ठिणगी डिझेल टाकीवर पडून स्फोट झाल्याने दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. ६) दुपारी दीडच्या सुमारास गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील गोसावी गल्लीत घडली. विद्यानंद रामजीत प्रजापती (वय ४६ वर्षे, सध्या रा. मणेर मळा, उंचगाव, ता. करवीर, मूळ रा. उत्तर प्रदेश) आणि रोहित रवींद्र गोसावी (वय १९ वर्षे, रा. गोसावी गल्ली, गडमुडशिंगी) अशी जखमींची नावे आहेत.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, गडमुडशिंगीतील रवींद्र राऊ गोसावी यांनी भंगारात आलेला ट्रक स्क्रॅप करण्यासाठी आणला होता. त्याचे वेगवेगळे स्पेअर पार्ट काढण्याचे काम रोहित गोसावी व त्यांचा कामगार विद्यानंद प्रजापती हे दोघे करीत होते. रोहित याने सकाळीच ट्रकच्या टाकीतील डिझेल काढले होते. त्यानंतरही काही डिझेल टाकीत शिल्लक होते. तसेच टाकीच्या पाइपचे तोंड बंद करायचे राहून गेले होते. दरम्यान, गॅस कटरच्या मदतीने ट्रकचे हूड काढण्याचे कम सुरू होते. कटरची ठिणगी डिझेल पाइपवर पडल्याने टाकीने पेट घेतला. काही क्षणातच टाकीचा स्फोट झाला. यावेळी टाकीजवळ उभे राहून काम करणारा कामगार भाजून गंभीर जखमी झाला. काही अंतरावरील रोहितही आगीत भाजून जखमी झाला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.स्फोटाने गल्ली हादरलीट्रक स्क्रॅप करताना झालेल्या स्फोटाने परिसर हादरला. आवाज ऐकून शेजारच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. भाजलेले कामगार आकांताने सैरभैर पळत होते. काही नागरिकांनी कामगारांच्या कपड्यांची आग विझवून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले.

नागरिकांना धोका

गडमुडशिंगीत भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह चालवणारी कुटुंबे आहेत. भरवस्तीत यांनी भंगाराचे साहित्य ठेवले असून, त्यात ज्वलनशील पदार्थ, वस्तू असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवू शकतो. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर