शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

घरगुती नैवेद्याने त्र्यंबोली यात्रेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 19:32 IST

Religious programme Tramboli kolhapur : पंचगंगा नदी घाटावर नव्या पाण्याचे पूजन, डोक्यावर पाण्याचे कलश घेतलेल्या कुमारिका, सुवासिनी आणि घरगुती नैवेद्याने मंगळवारी त्र्यंबोली देवीच्या आषाढी यात्रेला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देघरगुती नैवेद्याने त्र्यंबोली यात्रेला सुरूवातपंचगंगा घाटावर पाण्याचे पूजन : कोरोनापासून मुक्तीसाठी यज्ञ

कोल्हापूर : पंचगंगा नदी घाटावर नव्या पाण्याचे पूजन, डोक्यावर पाण्याचे कलश घेतलेल्या कुमारिका, सुवासिनी आणि घरगुती नैवेद्याने मंगळवारी त्र्यंबोली देवीच्या आषाढी यात्रेला प्रारंभ झाला.

कोरोनामुळे सध्या मंदिर बंद असल्याने भाविकांनी मंदिराबाहेरूनच देवीला नमस्कार केला आणि नैवेद्य अर्पण केले. यात्रेनिमित्त देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. तर कोरोना महामारीपासून माणसाची मुक्तता व्हावी यासाठी यज्ञ करण्यात आला.दरवर्षी आषाढ महिन्यातील मंगळवार व शुक्रवारी त्र्यंबोली देवीची यात्रा असते. यादिवशी नदीला आलेले नवे पाणी कळशीत भरून त्याचे पूजन केले जाते. पी ढबाकच्या गजरात भाभागातील तरुण मंडळांच्यावतीने त्र्यंबोली मंदिरापर्यंत मिरवणुक काढली जाते.

या सोहळ्यात कलश घेतलेल्या सुवासिनी व कुमारिकांना मोठा मान असतो. आषाढी एकादशी व गुरूपौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने यात्रेला जोर येतो, मंदिरात देवीला पाणी वाहून नैवेद्य दाखवला जातो. मंगळवारी यात्रेचा पहिला दिवस होता, यानिमित्त सकाळी देवीचा महाअभिषेक, आरती करण्यात आली. त्यानंतर सूर्यकांत गुरव, संतोष गुरव, प्रदीप गुरव यांनी सालंकृत पूजा बांधली. कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी यज्ञ करण्यात आला.यात्रेची सुरुवात घरगुती नैवेद्याने झाली. भागाभागातील महिला, मुली कलश घेवून मंदिराजवळ आले व बाहेरूनच देवीला पाणी वाहून नैवेद्य दाखवण्यात आला. अनेकजणांनी नैवेद्यएवजी कोरडी शिधा सामुग्री व आंबील अर्पण केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूरTempleमंदिर