शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘आजरा’तील आघाड्यांचा तिढा सुटेना

By admin | Updated: April 25, 2016 01:01 IST

कारखाना निवडणूक : अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस; तिरंगी लढतीची शक्यता, माघारीपर्यंत केवळ चर्चाच

ज्योतीप्रसाद सावंत--आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप आघाड्यांचा तिढा न सुटला नाही. त्यामुळे प्रसंगी स्वतंत्र आघाडीची तयारी ठेवत प्रमुख नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याने विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे ही निवडणुक तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गतवेळी एकाच आघाडीतून निवडणुकीला सामोरे गेलेल्या मंडळींनी आपापला सवतासुभा ठेवून पाच वर्षांची वाटचाल सुरू ठेवली. अनेकांनी आपल्या नेत्यांना रामराम करून सोयीने नेते स्वीकारले. काही मुद्द्यांवरून अंतर्गत संघर्ष उफाळून आला. यामुळे शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे.दरम्यान, झालेल्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक, तालुका संघ येथेही या संघर्षाचे पडसाद उमटत गेले. या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले. एक आमदार गमवावा लागला तर कार्यकर्त्यांसह काही नेत्यांनीही पक्षाशी फारकत घेतली.गेल्या वर्षभरात तर सत्ताधाऱ्यांमधील वाद जगजाहीर झाले. यातून चार भिंतीमधील चर्चा चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. गोपनियता हा प्रकारच राहिला नाही. अनेक संचालकांची सुधारलेली आर्थिक स्थिती सभासदांच्या व कार्यकर्त्यांच्या नजरेतून सुटली नाही. याचाच परिणाम म्हणून कार्यकर्त्यांना कारखाना संचालकपदाची स्वप्ने पडू लागली. वेळोवेळी राजकीय पेचात सापडणाऱ्या नेत्यांना कोंडीत पकडून आपली कारखान्याची उमेदवारी घट्ट करण्याकरिता प्रयत्न सुरू झाले. नेत्यांनीही शब्द देऊन वेळ मारून नेली आणि आता मात्र ‘बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला’ अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने नेतेमंडळींना कार्यकर्त्यांचे ‘बंड’ थोपविण्याचे नव्हे आव्हानाला सामोरे जावे लागत आहे.अण्णा-भाऊ संस्था समूहप्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनाच आव्हान देत जे सोबत येतील त्यांना घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असे यापूर्वीच जाहीर केले आहे. असे असले तरी त्यांची राष्ट्रवादीशी चर्चा सुरूच आहे. त्यामुळे इच्छुकांची धडधड वाढली आहे. प्रचंड यंत्रणा व आर्थिक पाठबळ यामुळे अशोकअण्णांसोबत जाण्यास अनेकजण इच्छुक आहेत. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रवींद्र आपटे यांचा गट, विश्वनाथ करंबळी, श्रीपतराव देसाई यांच्यासह विद्यमान आठ संचालक यांनी यापूर्वीच अशोकअण्णांच्या सोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.राष्ट्रवादी सत्ताधारी पक्ष आहे. अल्बर्ट डिसोझा, मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे, उदय पवार, सुधीर देसाई अशी बड्या नेतेमंडळींची फौज राष्ट्रवादीकडे आहे. सोबत राष्ट्रीय काँगे्रस व छोटे-मोठे गट आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांचा भक्कम आधार हे राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. सद्य:स्थितीत जयवंतराव शिंपी, विष्णूपंत केसरकर यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. विळ्या-भोपळ्याचे सख्य असणारी मंडळी कितपत एकत्र राहणार यावरही राष्ट्रवादीचे यशापयश अवलंबून आहे.एकीकडे अशोकअण्णांनी आपणाला कुणाचेही वावडे नाही असे सांगून आघाडीची बांधणी सुरू केली असताना राष्ट्रवादीत मात्र हा नको, तो नको, असाच सूरच आहे. गडहिंग्लज कारखाना निवडणूक निकालातून राष्ट्रवादीने काहीही बोध घेतलेला नाही. हेदेखील यानिमित्ताने प्रकर्षाने जाणवत आहे. उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून माघारीपर्यंत चर्चाही सुरू राहणार आहे.चंद्रकांतदादांचीही फिल्डिंगसहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आजरा साखर कारखाना पार्श्वभूमीवर जोरदार फिल्डिंग लावली आहे.एका बड्या स्थानिक नेत्यांशी त्यांचा संपर्क सुरू आहे. हा नेता गळाला लागला तर सर्व रसद पुरवून विरोधी आघाडी भक्कम करून ‘भाजप’च्या लेबलवर निवडणूक जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.