शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

बाजार समितीसाठी तिरंगी लढत

By admin | Updated: June 14, 2015 01:51 IST

१९ जागांसाठी १०८ रिंगणात : १२ जुलैला मतदान होणार; १४ रोजी मतमोजणी

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या १९ जागांसाठी १०८ जण रिंगणात राहिले आहेत. ६४८ जणांनी माघार घेतली असून, शनिवारी एकाच दिवशी तब्बल ६३३ जणांनी माघार घेतल्याने अक्षरश: झुंबड उडाली होती. राष्ट्रवादी -जनसुराज्यची ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास,’ कॉँग्रेसप्रणीत ‘राजर्षी शाहू’ व शिवसेना-भाजपची ‘शिवशाहू शेतकरी परिवर्तन’ आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. १२ जुलैला मतदान होणार असून १४ जुलैला मतमोजणी केली जाणार आहे. समितीसाठी विविध गटांतून तब्बल ९०६ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ७५६ अर्ज शिल्लक राहिले होते. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवशी अवघ्या पंधराजणांनी माघार घेतली होती. शनिवारी सकाळपासून पॅनेलच्या घोषणेकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. संधी मिळणार नाही, हे अनेकांना अगोदरच माहीत होते, तरीही शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी थांबल्याने नेत्यांबरोबर निवडणूक यंत्रणेवर ताण आला होता. दुपारी एक ते तीन या वेळेत सुमारे पावणे सहाशे अर्जांची माघारी झाल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. १९ जागांसाठी १०८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. कॉग्रेसमध्ये दुफळी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी दिवसभरातील नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी कॉग्रेससोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल केले. तर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्याने कॉग्रेसमध्ये उघड फूट पडली. ‘शेकाप’ने शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने गेले आठ दिवस सुरू असलेल्या घडामोडीला एकदम कलाटणी मिळाली. गेले आठ-दहा दिवस राष्ट्रवादी-जनसुराज्य-कॉग्रेसमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू होती. शुक्रवारी दिवसभर आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे व पी. एन. पाटील यांच्यात चर्चा झाली. पी. एन. पाटील सहा जागांवर आग्रही राहिले. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा मुश्रीफ व कोरे यांच्यात तासभर चर्चा झाली. यामध्ये पी. एन. पाटील यांना बाजूला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी सकाळी आमदार मुश्रीफ यांनी नागाळापार्क येथील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली. येथेच पाटील यांच्याशी आघाडी करायची नाही, यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाटील यांच्याशी चर्चा बंद करत असताना सतेज पाटील यांच्याशी चर्चा सुरू ठेवली. अखेरच्या टप्प्यात सतेज पाटील यांना दोन जागा देत आघाडीची घोषणा केली. शिवसेना-भाजप आघाडीचे नेतेही सतेज पाटील यांच्या संपर्कात होते; पण ते राष्ट्रवादी आघाडीसोबत गेल्यानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांनी पी. एन. पाटील आपल्याबरोबर येतील का? यासाठी चाचपणी सुरू केली; पण आमदार चंद्रदीप नरके आघाडीत असल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनेल करण्याचा निर्णय घेतला. चार माजी संचालकांचा समावेश राष्ट्रवादी आघाडीतून परशुराम खुडे व उदय पाटील, शिवसेना आघाडीतून बाबगोंडा पाटील, तर कॉँग्रेस आघाडीतून माजी सभापती संभाजीराव पाटील -कुडित्रेकर या चार माजी संचालकांना संधी देण्यात आली. पत्रातून कळविला नकार कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. शुक्रवारी (दि. १२) रात्रीच पी. एन. पाटील यांना आघाडीसोबत घ्यायचे नाही, हे जवळपास निश्चित झाले होते. तरीही औपचारिकता म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शनिवारी सकाळी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि अर्ध्या तासात पत्र पाठवून, आपणाला सन्मानजनक जागा देऊ शकत नसल्याने आपण पुढील विचार करावा, असे पत्र आमदार हसन मुश्रीफ यांनी पी. एन. पाटील यांना पाठविले. चार माजी संचालकांचा समावेश राष्ट्रवादी आघाडीतून परशुराम खुडे व उदय पाटील, शिवसेना आघाडीतून बाबगोंडा पाटील, तर कॉँग्रेस आघाडीतून माजी सभापती संभाजीराव पाटील -कुडित्रेकर या चार माजी संचालकांना संधी देण्यात आली. पत्रातून कळविला नकार कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. शुक्रवारी (दि. १२) रात्रीच पी. एन. पाटील यांना आघाडीसोबत घ्यायचे नाही, हे जवळपास निश्चित झाले होते. तरीही औपचारिकता म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शनिवारी सकाळी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि अर्ध्या तासात पत्र पाठवून, आपणाला सन्मानजनक जागा देऊ शकत नसल्याने आपण पुढील विचार करावा, असे पत्र आमदार हसन मुश्रीफ यांनी पी. एन. पाटील यांना पाठविले.