शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीतील सावकाराच्या घराची ‘सहकार’कडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 13:01 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र सावकारी अधिनियमअंतर्गत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर गुरुवारी सहकार खात्याच्या पथकाने राधानगरीतील अवैध सावकार ...

ठळक मुद्दे अमित गराडे यांच्या पथकाने केली कारवाई

कोल्हापूर : महाराष्ट्र सावकारी अधिनियमअंतर्गत जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर गुरुवारी सहकार खात्याच्या पथकाने राधानगरीतील अवैध सावकार मनोहर पोवार यांच्या घरावर छापा टाकून कागदपत्रांची झाडाझडती घेतली. यात आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत. साहाय्यक निबंधक अमित गराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

अवैधरीत्या सावकारी करणाऱ्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी मोहीमच उघडली आहे. कार्यालयाकडे येणाºया प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून तातडीने कारवाई केली जात आहे. राधानगरी येथील मनोहर पोवार यांच्याविषयीही अशाच तक्रारी सातत्याने येत होत्या. त्यांची दखल घेत गुरुवारी पथकाने अचानकपणे घरावर छापा टाकत कागदपत्रे ताब्यात घेतली.

यात कच्च्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या, कोरे व लिखित चेक, हस्तलिखित बॉँड, इतर व्यक्तींचे बँक पासबुक, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, तक्रारदार यांचे चारचाकी गाडीचे आरसी बुक, गाडीची चावी अशी महत्त्वपूर्ण कागदपत्रे तपासणी अधिकाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली. आता या कागदपत्रांची चौकशी सहकार, पोलीस व महसूल यंत्रणेमार्फत सुरू होणार आहे.२0 जणांचे पथकउपनिबंधक अमर शिंदे व साहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी या कामी विशेष पथक नेमले होते. यात सहकार विभागाचे चार अधिकारी, १६ कर्मचारी, तीन पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश होता.-----------------------------------बिनधास्त तक्रार करा, कारवाई करूअवैध सावकारीच्या अनुषंगाने आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकावली असल्याने सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे बिनधास्त तक्रार करा, तक्रारदाराचे नाव गुप्त राखून तातडीने कारवाई करू असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी