शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

जलवाहिनी स्थलांतराचा प्रस्ताव बारगळला

By admin | Updated: July 27, 2015 00:28 IST

जयसिंगपूर रस्ता डांबरीकरण : चार कोटी ८७ लाख रुपयांचा प्रस्ताव, दुपदरी रस्ता सात मीटर डांबरीकरणाचा परिणाम

जयसिंगपूर : शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणामुळे जलवाहिनी स्थलांतराचा विषय अखेर बारगळला आहे. शहराला नळपाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन (जलवाहिनी) स्थलांतरीत करण्याचा ४ कोटी ८७ लाख रूपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. सात मीटर डांबरीकरणामुळे हा प्रस्ताव अखेर मागे पडला आहे. जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या दुपदरी रस्त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन नगरपालिकेने स्वखर्चाने स्थलांतरीत करून घ्याव्यात, अशा आशयाचे पत्र ठेकेदार सुप्रीम बेस्ट व्हॅल्यू या कंपनीने दिले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला होता. उदगाव येथून जलशुद्धीकरणाकडे येणारी साडेतीन किलोमीटरची अशुद्ध पाण्याची तसेच सात किलोमीटरच्या पाणी शुद्धीकरण वितरण नलिकेचा खर्च हा पालिकेला आर्थिकदृष्ट्या न पेलवणारा असल्यामुळे व पाईपलाईन स्थलांतरीत करावयाची झाल्यास दीर्घकाळ पाणीपुरवठा खंडित करून ६० हजार लोकसंख्या असलेल्या शहराचा पाणीपुरवठा ठप्प होणार या कारणातून पालिकेने ठराव केला होता.रस्ता रूंदीकरणात पाणीपुरवठा जलवाहिनी ठेकेदार कंपनीने स्वखर्चाने स्थलांतरित करावी अथवा प्रस्तावित अंदाजपत्रकात याबाबत विशेष तरतूद करून हा निधी पालिकेकडे वर्ग करावा, असा निर्णय सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार आघाडी सरकारकडे पालिकेने पत्रव्यवहार केला होता. दरम्यान, जयसिंगपूर शहरातून जाणारा दुपदरी रस्ता ७ मीटर डांबरीकरण करण्यात आला आहे. यामुळे मुख्य पाईपलाईन बदलण्याचा विषय मागे पडला आहे. पाईपलाईन बदलावी लागणार नसल्यामुळे पालिकेकडून देण्यात आलेला चार कोटी ८७ लाखांचा प्रस्ताव बारगळला आहे. (प्रतिनिधी)नगरपालिकेने पाईपलाईन बदलणे गरजेचे भविष्यात रस्ता रूंदीकरण झाल्यास नगरपालिकेला ही पाईपलाईन बदलणे गरजेचे ठरणार आहे. यामुळे त्यादृष्टीने पुन्हा ठराव करून पालिकेला योग्य नियोजन करावे लागणार आहे, अशी माहिती नगरसेवक अस्लम फरास यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.४चौपदरीकरणांतर्गत मोठ्या रस्त्याचे नियोजन झाले असते तर जलवाहिनी बदलण्याशिवाय पर्याय उरला नसता. पाईपलाईन बदलामुळे शहरातील नळपाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला असता. परिणामी, पाणीपुरवठा काही दिवस ठप्प झाला असता.