शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा ४० शिक्षकांच्या बदल्या, सभापतीच अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:57 IST

आंतरजिल्हा बदली झालेल्या ४९ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांना कार्यमुक्त करताना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना माहितीच दिली नसल्याने जिल्हा परिषदेत या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्वत: यादव यांनीच याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

ठळक मुद्देआंतरजिल्हा ४० शिक्षकांच्या बदल्यासभापतीच अनभिज्ञ

कोल्हापूर : आंतरजिल्हा बदली झालेल्या ४९ शिक्षकांपैकी ४० शिक्षकांना कार्यमुक्त करताना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना माहितीच दिली नसल्याने जिल्हा परिषदेत या मुद्यावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. स्वत: यादव यांनीच याबाबत पत्रक प्रसिध्दीस दिले आहे. यादव यांनी  याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना जाब विचारल्याचे समजते. तसेच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांचीही भेट घेतली.कोल्हापूर जिल्ह्यात येणारे शिक्षक अजूनही जिल्ह्यात हजर झालेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा जरी बंद असल्या तरी अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षक हजर झाल्यानंतर या ४९ शिक्षकांना सोडावे, अशी भूमिका घेतली जाते. बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनीही याबाबत पत्र दिले होते.या सर्व पार्श्वभूमीवर सभापती यादव यांना कल्पना न देताच या ४० शिक्षकांच्या बदलीची फाईल प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे पाठवली.

त्यांनीही या शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यानंतर संबंधित शिक्षकांना सोडण्याचे आदेश तालुक्यांना प्राप्त झाल्यानंतर अनेक सभापतींनी शिक्षण सभापतींकडे चौकशी सुरू केली. मग मात्र यादव यांनी उबाळे यांना बोलावून याबाबत आपल्याला कल्पना का दिली नाही याचा जाब विचारला.पर्यायी व्यवस्था काय केली ?शिक्षण समितीला विश्वासात न घेता हा निर्णय घेताना पर्यायी व्यवस्था काय केली असा सवाल शिक्षण सभापती यादव यांनी पत्रकाव्दारे उपस्थित केला आहे. शिक्षण समितीची सभा होणार असून त्यामध्येही या विषयावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेच्या जागेवर खासगी कुस्ती प्रशिक्षण देण्याचा मुद्दाही यावेळी चर्चेत येणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र