शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

वाहतूकदारांनी महामार्ग रोखला : पाचशे कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:07 IST

कोल्हापूर :डिझेल दरवाढ रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी मार्केट यार्ड, उजळाईवाडी, विकासवाडी, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. या बंदमुळे जनजीवनावर अद्यापही थेट परिणाम झाला नसला तरी तरीही पाचशे कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आहे. आज, सोमवारपासून आंदोलन ...

कोल्हापूर :डिझेल दरवाढ रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी वाहतूक संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी मार्केट यार्ड, उजळाईवाडी, विकासवाडी, शिरोली येथे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. या बंदमुळे जनजीवनावर अद्यापही थेट परिणाम झाला नसला तरी तरीही पाचशे कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आहे. आज, सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला असून यामुळे याची झळ सर्वसामान्यांना बसू शकते.आॅल इंडिया मोटर्स ट्रॉन्स्पोर्ट काँग्रेस नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या वतीने वारंवार होणारी इंधन दरवाढ रद्द करावी, टोल प्रक्रिया पारदर्शी करावी, ‘थर्ड पार्टी’ विमा हप्त्यामधील वार्षिक दरवाढ रद्द करावी, जीएसटी व ई-वे बिलातील अडचणी, भाडे देण्यासाठी होणाºया विलंबात सुधारणा करावी, पर्यटन वाहनासाठी दीर्घ मुदतीसाठी आॅल इंडिया परमिट मिळावे, आरटीओ व पोलिसांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, आयकर कलम ४४ ए नुसार बेकायदेशीर आकारणी होणारा आयकर रद्द करा, यासह अन्य प्रलंबित मागण्यांकरिता हा चक्काजाम सुरू करण्यात आला आहे. यात देशभरातील मालवाहतूकदार सहभागी झाले आहेत.रविवारी जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनतर्फे विविध गट तयार करून महामार्गावर वाहतूक रोखण्याचे काम सुरू होते. यात मार्केट यार्ड, उजळाईवाडी, विकासवाडी, शिरोली, आदी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील वाहतूक रोखली जात होती. यातील ट्रकचालकांना वाहने रस्त्याकडेला लावण्याची सक्ती केली जात होती.इचलकरंजीतील २५० कोटींची उलाढाल ठप्पवाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनाचा येथील वस्त्रोद्योगावर परिणाम दिसू लागला असून, दररोजची २५० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची चिन्हे आहेत. कापड व्यापाºयांकडून यंत्रमाग कापडाचे सौदे रद्द करण्याची स्थिती निर्माण झाल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे.शहरामधील यंत्रमागावर कापड विणण्यासाठी आवश्यक असलेल्या सुतापैकी सुमारे ८० टक्के सूत दक्षिणेतील तामिळनाडू व आंध्र राज्यातून येते. तसेच येथे उत्पादित झालेले कापड गुजरात, राजस्थान व दिल्ली येथील पेठांमध्ये विक्री केले जाते. २० जुलैपासून सुरू झालेल्या वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनामुळे सुताची आवक ठप्प झाली आहे. तसेच येथून जाणाºया कापडाची वाहतूकसुद्धा बंद पडली आहे. कापडाची जावक बंद झाल्याने कापड खरेदी करणाºया व्यापाºयांकडून यापूर्वी केलेले सौदे रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.दररोज येणारे आणि जाणारे कापड यांची सुमारे २५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असते. संपामुळे सूत व कापड यांची वाहतूक ठप्प झाल्याने ही आर्थिक उलाढाल बंद पडण्याची शक्यता आहे.आर्थिक कोंडी होण्याची भीतीवस्त्रोद्योगात मंदीच्या पार्श्वभूमीवर चक्काजाम आंदोलनाचा अवघ्या दोन दिवसांतच वस्त्रोद्योगावर परिणाम दिसत आहे. कापड व्यापाºयांकडून कापडाची डिलिव्हरी घेण्याचे बंद झाले असून कापडाचे चेकींगसुद्धा ठप्प झाले आहे.