शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘गडहिंग्लज’ला वाहतुकीचा आराखडा

By admin | Updated: October 6, 2015 23:18 IST

नागरिकांच्या सूचना : सुरक्षित वाहतुकीवर दोन तास चर्चा, पालिका करणार नियोजन

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील वाहतुकीची कोंडी आणि वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन नागरी सुरक्षिततेसाठी वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचा निर्णय शहरातील मान्यवर व नागरिकांच्या बैठकीत झाला. सूचनांच्या स्थानिक पातळीवरील कार्यवाहीची जबाबदारी नगरपालिका व पोलिसांनी घेतली.गेल्या पंधरा दिवसांत शहरात झालेल्या दोन अपघातात दोन निष्पाप महिलांचा मृत्यू झाला. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ‘सुरक्षित वाहतुकीच्या उपाययोजने’वर विचारविनिमयासाठी ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेश बोरगावे होते. पालिकेच्या शाहू सभागृहात ही बैठक झाली.नगर अभियंता रमेश पाटील, पोलीस कर्मचारी दत्ता शिंदे, भाजप शहराध्यक्ष आनंद पेडणेकर, ‘दानिविप’चे रमजान अत्तार, भारतीय किसान संघाचे राम पाटील, हॉटेल असोसिएशनचे रोहन हंजी, कॉ. आय. सी. पाटील, रमेश शिंदे, अजित चोथे, सिद्धार्थ बन्ने यांनीही सूचना मांडल्या. आठवडा बाजाराच्या दिवशी बॅ. नाथ पै विद्यालय, म. दु. श्रेष्ठी विद्यालय व लक्ष्मी मंदिर आवार याठिकाणी पे अँड पार्किंगची व्यवस्था करावी, अशी सूचना करण्यात आली. नागरिकांच्या सूचनांची नोंद घेऊन वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करून शासनाच्या मंजुरीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष बोरगावेंनी दिली.आगारप्रमुख सुनील जाधव, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र कावणेकर, उपाध्यक्ष विरुपाक्ष पाटणे, जि. प.चे सदस्य शिवप्रसाद तेली, लायन्स क्लबचे अध्यक्ष रमेश वांद्रे, सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर्सचे अनिल मगर, कृष्णात पर्यावरण संस्थेचे अनंत पाटील, शहर किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद रिंगणे, बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कोळकी, सुनील गुरव, जिजाऊ ब्रिगेडच्या अलका भोईटे, रेखा पोतदार, सुनील गुरव उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन श्रीनिवास वेर्णेकर यांनी केले. नगरसेविका अरुणा शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘रोटरी’ने दाखवली बांधीलकीसुरक्षित वाहतुकीसाठी धोक्याच्या ठिकाणी रेडियम रेफ्लेक्टर, नो-पार्किंग, पार्किंग, वेगमर्यादा आदी सूचना फलक ‘रोटरी’ क्लबतर्फे बसवून देण्यात येतील, अशी ग्वाही ‘रोटरी’चे अध्यक्ष बाळासाहेब गुरव यांनी दिली.कोण काय म्हणाले ?गटनेत्या प्रा. स्वाती कोरी : रिंगरोडचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी आणि संबंधित शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेऊन वळण रस्त्यांच्या भू-संपादनाचा प्रश्न सामोपचाराने मिटवावा.विरोधी पक्षनेते रामदास कुराडे : शहरातील अधिकृत बसथांब्यावरच बसेस थांबवाव्यात. वाहतुकीची कोंडी होणाऱ्या बसवेश्वर चौकातील बसथांबा अन्यत्र हलवावा.मुख्याधिकारी तानाजी नरळे : पार्किंग-नो पार्किंग आणि एकेरी वाहतुकीबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविला जाईल. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शेळके : ट्रॅव्हल बसेसचा थांबा तातडीने बदलला जाईल.डॉ. बी. एस. पाटील : वाहतुकीच्या विकेंद्रीकरणासाठी शहराच्या पश्चिम भागात दुसरे बसस्थानक व्हावे. अपघातातील जखमींवर उपचारासाठी गडहिंग्लजमध्ये अत्याधुनिक शासकीय ट्रामा सेंटरची गरज आहे.रवींद्र बेळगुद्री : शहरातून होणाऱ्या ऊस वाहतुकीची वेळ निश्चित करावी.महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे : शहरात अधिकृत वाहनतळांची व्यवस्था करावी.माजी प्राचार्य सदानंद वाली : विनापरवाना वाहने चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या पालकांनाही समज द्यावी.नगरसेवक बसवराज खणगावे : चेहऱ्यावर स्कार्प बांधून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करावी.तातडीने सुरू झाली कार्यवाहीट्रॅव्हल बसेसना नगरपालिकेसमोर थांबण्यास प्रतिबंध.मेन रोडवरील दुतर्फा दुकानांसमोरील विषम तारखांच्या पार्किंगची अंमलबजावणी.भरधाव धावणाऱ्या वाहनांवर शहरात वेगमर्यादा.लायसेन्सशिवाय वाहने चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.मेनरोड व बाजारपेठेतील दुकानासमोरील अतिक्रमणे हटविणार.‘लोकमत’च्या वृत्ताची चर्चागडहिंग्लज शहरातील नागरी सुरक्षिततेचा प्रश्न आणि वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी व सुरक्षित वाहतुकीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात ‘गडहिंग्लज’मध्ये नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ! या मथळ्याखाली विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. या सडेतोड बातमीची शहरात चर्चा झाली. ‘लोकमत’ने सुचविलेल्या सूचना काही नागरिकांनी बैठकीत जोरदारपणे मांडल्या.