शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प

By admin | Updated: June 8, 2014 01:12 IST

तिघे जखमी : सांगली फाटा येथे ट्रक-कार अपघात

शिरोली : पुणे-बंगळूर महामार्गावर शिरोली-सांगली फाटा येथे मालवाहतूक ट्रक आणि इंडिका कार यांची धडक होऊन विश्वजित बंडोपंत वाडकर, प्रताप बाळासो जाधव, दिग्विजय धोंडिराम चौगुले (सर्व रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी) हे तिघेजण जखमी झाले. अपघात मध्यरात्री अडीच वाजता झाला. यामुळे सुमारे आठ तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.कोल्हापूर-सांगली मार्गावर जैन मंदिराच्या समोर ट्रक बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. या मार्गावर हेर्लेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. या दोन्ही अपघातांमुळे शिरोली-सांगली फाटा पूर्णपणे ठप्प झाला होता. याबाबत अधिक माहिती अशी, विश्वजित वाडकर, प्रताप जाधव, दिग्विजय चौगले आणि प्रकाश राऊत हे सोन्याची शिरोलीतील चौघेजण इंडिका कारमधून रायगडला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गेले होते. ते रात्री दोनच्या सुमारास कोल्हापुरात आले. त्यांना गाडीत डिझेल भरावयाचे होते; पण कोल्हापुरातील सर्व पेट्रोल पंप बंद होते, म्हणून ते शिरोली-सांगली फाटा येथे डिझेल भरण्यासाठी आले असता बंगलोरहून पुण्याकडे मिरची घेऊन जाणारा मालवाहतूक ट्रक व इंडिका कार यांची सांगली फाटा उड्डाणपुलाखाली मध्यरात्री अडीच वाजता जोराची धडक झाली. यात विश्वजित, प्रताप व दिग्विजय हे जखमी झाले आहेत.दोन्ही वाहने महामार्गावरच अडकल्याने कोल्हापूर-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत गेली. पहाटे पाचनंतर महार्गावरील वाहतूक वाढल्याने सांगली फाटा ठप्प झाला. तसेच कोल्हापूर-सांगली मार्गावर शिरोली जैन मंदिर येथे सकाळी दहा वाजता एक ट्रक रस्त्यातच बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूकही दोन तास विस्कळीत झाली. त्यामुळे सांगली-कोल्हापूर व कोल्हापूर-पुणे मार्गावरील वाहतूक दुपारी बारा वाजता सुरळीत झाली.