शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईची परंपरा जपली जावी

By admin | Updated: June 13, 2017 01:02 IST

पेहरावसंबंधी वाद : विविध व्यक्ती संस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला करण्यात आलेल्या घागरा-चोलीच्या पेहरावविरोधात विविध व्यक्ती व संस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. पुजारीमुक्त मंदिर व्हावे : शरद तांबट श्री अंबाबाई मूर्तीचे अपुरे संवर्धन, मंदिरातील दुरवस्था आणि श्रीपूजकांचे गैरवर्तन याबाबत देवस्थानने आवाज उठवून आठवडा झाला नाही तोपर्यंत पुजाऱ्यांनी देवीला घागरा-चोलीचा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शासनाने हे मंदिर श्रीपूजकमुक्त करून सर्वसमावेशक पुजारी नेमावेत, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या भक्ताने लाख रुपये देऊन आपल्या नामांच्या वस्त्रांची जाहिरात करायला सांगितली तर श्रीपूजक त्या पद्धतीने पूजा करतील. शासनानेच अंबाबाईची ही अवहेलना थांबवावी. भाविकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता या श्रीपूजकांची हकालपट्टी करून त्याजागी शिर्डी व पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक पुजारी मंडळ ताबडतोब नेमण्यात यावे. अंबाबाईच्या पूजेची संस्कृती जपावी : सुरेश साळोखेगेली हजारो वर्षे श्री अंबाबाई देवीची पारंपरिक पद्धतीने होणारी पूजा व परंपरेला फाटा देत श्रीपूजकांनी चोली-घागरा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रश्नी समन्वय समिती स्थापन करून वाद मिटवून अंबाबाईची संस्कृती जपावी, अशी मागणी माजी आमदार सुरेश साळोखे यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे की, साडी-चोळी हा श्री अंबाबाईचा पारंपरिक पेहराव असतानाही पैशाच्या आमिषापोटी भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीपूजकांच्या चुकीच्या कृत्यामुळे मंदिराचे व्यापारीकरण चालले आहे. हे मंदिर कोणाची तरी मक्तेदारी होत आहे. पूजेच्या नावाखाली खेळखंडोबा होऊन देवीचे पावित्र्य नष्ट होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान समितीचे दोन सदस्य, श्रीपूजकांचेदोन सदस्य, जिल्हा पोलीसप्रमुख, नागरिकांमधील दोन सदस्य अशी दहा जणांची समन्वय समिती स्थापन करून संवादाने हा वाद मिटवावा, अशी मागणी साळोखे यांनी केली.यावेळी शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप पाटील, दीपक मगदूम, सुरेश पाटील, अनिल साळोखे, दिलीप जाधव, दिलीप देसाई, युवराज खंडागळे, राजू मोहिते, मुबारक शेख, प्रसाद कुलकर्णी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.अंबाबाईची संस्कृती जपावी, या मागणीचे निवेदन माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले.