याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मुरगूड येथील जगद्गुरू सदाशिव गोरुले यांच्या मालकीचा ट्रॅक्टर ( क्र. एमएच ०९ एफबी ३८६३ ) मधून ऊस घेऊन चालक प्रवीण तानाजी गोरुले ( रा. मुरगूड ) हा बिद्री साखर कारखान्याकडे चालला होता. मुधाळतिट्टा ते बिद्रीदरम्यान असलेल्या उतारावरून जात असताना ट्रॅक्टर - ट्रॉलीचा हुक तुटल्याने दोन्ही छकडा गाड्या जागेवरच पलटी झाल्या.
यावेळी छकड्यातील ऊस रस्त्यावर विस्कटून पडला होता, तर ट्रॅक्टर रस्त्यावरून खाली पाच ते सहा फूट चरीत जाऊन अडकला होता. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच उडी मारल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघातात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. छकडा गाडीतील ऊस मुख्य रस्त्यावर विस्कटून पडल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यावरील ऊस बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
.........
फोटो
बोरवडे : बिद्री - मुधाळ तिट्टा रस्त्यावर पलटी झालेला उसाचा ट्रॅक्टर.