शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा थकविल्याबद्दल टॉवर, पेट्रोल पंप सील, कोल्हापूर महापालिका प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:52 IST

कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाची थकबाकी वसूल करण्याकरीता संबंधित मिळकतीवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले असून त्यानुसार मोठ्या थकबाकीदारांवर जप्ती व सील करण्याची कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात आली. जप्तीनंतरही मिळकतधारकांनी थकबाकीची रक्कम भरली नाहीतर मिळकतीवर बोजा नोंद करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देघरफाळा थकविल्याबद्दल टॉवर, पेट्रोल पंप सील कोल्हापूर महापालिका प्रशासनाची कारवाई

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाची थकबाकी वसूल करण्याकरीता संबंधित मिळकतीवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले असून त्यानुसार मोठ्या थकबाकीदारांवर जप्ती व सील करण्याची कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात आली. जप्तीनंतरही मिळकतधारकांनी थकबाकीची रक्कम भरली नाहीतर मिळकतीवर बोजा नोंद करण्यात येणार आहे.बुधवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयातर्फे ए वॉर्ड येथील रि.स.नं. २४०३ , वरुणतीर्थवेस निवृत्ती चौक येथील मारुती व पांडुरंग संतराम पाटील यांचे मिळकतीमध्ये असलेला जी.टी.एल. मोबाईल कंपनीचा टॉवर सील करण्यात आला. त्यांनी थकबाकीची रक्कम आठ लाख ६५ हजार ९४० रुपये भरलेले नाहीत. बी वॉर्ड सि.स.नं. २८७० / क ३ जवाहरनगर मेन रोडवरील इंडियन आॅईल कॉर्पो. लि.चा पेट्रोलपंपही सील करण्यात आला. त्यांनी थकबाकी रक्कम दोन लाख १६ हजार ०३८ रुपये भरलेले नव्हते.तसेच ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत हॉटेल एलिगंट येथील जी. टी.एल. कंपनीचा टॉवर सात लाख ३३ हजार रुपये थकबाकी भरली नाही म्हणून सील करण्यात आला. या कारवाई अंतर्गत आज ताराबाई पार्क येथील स्टेट बँक आॅफ पटियाला यांच्याकडून ३० लाख ६३ हजार २६६ रुपये तर न्यू शाहूपुरी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेकडून चार लाख ५० हजार ९७० रुपये थकबाकीसह वसूल करण्यात आले.ही कारवाई उपआयुक्त मंगेश शिंदे व कर निर्धारक संग्राहक दिवाकर कारंडे यांचे मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक विशाल सुगते, अनिरुद्ध शेटे, सहायक अधीक्षक विजय वणकु द्रे, वसुली लिपीक भगवान मांजरे, सुभाष ढोबळे, राकेश भोसले, श्रीकांत चव्हाण, मुरलीधर बारापात्रे व कर्मचाऱ्यांनी केली.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर