शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पीटीएमला केएसए लीगचे विजेतेपद, शिवाजी तरुण मंडळ उपविजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 19:28 IST

कोल्हापूर : सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून अत्यंत चुरशीने आणि मिळेल त्या संधीचा फायदा घेत गोल करण्यासाठी मैदानात उतरलेल्या खेळाडूंनी श्वास ...

कोल्हापूर : सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून अत्यंत चुरशीने आणि मिळेल त्या संधीचा फायदा घेत गोल करण्यासाठी मैदानात उतरलेल्या खेळाडूंनी श्वास रोखून धरण्यासारखा खेळ केला. प्रत्येक मिनिटाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढली. केवळ एकमेव गोलच्या आधारे पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने श्री शिवाजी तरुण मंडळावर १-० अशा गोलफरकाने मात करून श्री शाहू छत्रपती केएसए लीग फुटबॉल लीग ए डिव्हिजनमधील स्पर्धेचा विजेता ठरला. श्री शिवाजी तरुण मंडळ उपविजेते ठरले. खंडोबा तालीम मंडळाने तिसरा आणि बालगोपाल तालीम मंडळाने चौथा क्रमांक पटकाविला.केएसए लीगमधील अंतिम सामना शाहू स्टेडियमवर पार पडला. अटीतटीच्या सामन्यासाठी सुमारे वीस हजारांहून अधिक प्रेक्षकांनी सामन्यासाठी हजेरी लावली. अंतिम सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ अ संघात झाला. श्री शिवाजी तरुण मंडळ संघावर १ - ० असा विजय मिळवत पाटाकडील तालीम मंडळ संघाने लीग स्पर्धेमध्ये १५ गुणांची कमाई केली. या गुणांच्या जोरावर पीटीएमने केएसए फुटबॉल चषकावर नाव कोरले. सामन्यातील एकमेव गोल ऋषिकेश मेथे पाटील याने नोंदविला.पूर्वाधात ‘पाटाकडील’च्या ऋषिकेश मेथे - पाटील याने कॉर्नर किकवर मारलेला फटका ‘श्री शिवाजी’चा गोलकीपर मयुरेश चौगुले याने तटविला. ‘श्री शिवाजी’च्या संकेत साळोखे, इंद्रजीत चौगुले, करण चव्हाण - बंदरे यांनी गोलसाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पूर्वाधात गोल शून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात ‘पाटाकडील’च्या ओंकार मोरे याच्या पासवर प्रथमेश हेरेकर याने मारलेला सुरेख फटका गोल पोस्टच्या जवळून गेला. ‘श्री शिवाजी’च्या करण चव्हाण बंदरे याची संधी वाया गेली.सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला प्रतीक बदामे याच्या पासवर ऋषिकेश मेथे - पाटील याने हेडद्वारे सुरेख गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी फेडण्यासाठी ‘श्री शिवाजी’ संघाकडून जोरदार चढाया झाल्या, मात्र त्यांना यश मिळाले नाही. सामन्यात १ - ० या गोल संख्येच्या ‘पाटाकडील’ने सामन्यात विजय संपादन केला.

सामना जिंकल्याने ‘पीटीएम’चे १२ वरून १५ गुण झाल्याने संघ या लीग स्पर्धेत विजेता ठरला. श्री शिवाजी तरुण मंडळ १४ गुणांसह दुसऱ्या तर खंडोबा तालीम मंडळ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिले. बालगोपाल तालीम मंडळ संघाला १२ गुणांसह चतुर्थस्थानी समाधान मानावे लागले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल