कोल्हापूर टूरिझम कल्चरल फाउंडेशनतर्फे पर्यटन सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:01 PM2019-10-11T12:01:53+5:302019-10-11T12:02:55+5:30

कोल्हापूर येथील कोल्हापूर टूरिझम अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांनी पर्यटन सप्ताह साजरा करण्यात आला.

Tourism Week by Kolhapur Tourism Cultural Foundation | कोल्हापूर टूरिझम कल्चरल फाउंडेशनतर्फे पर्यटन सप्ताह

कोल्हापूर टूरिझम व कल्चरल फाउंडेशनतर्फे पर्यटन सप्ताहात सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले.

Next
ठळक मुद्देकोल्हापूर टूरिझम कल्चरल फाउंडेशनतर्फे पर्यटन ५000 हून अधिक पर्यटकांचे सर्वेक्षण

कोल्हापूर : येथील कोल्हापूर टूरिझम अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांनी पर्यटन सप्ताह साजरा करण्यात आला.

कोल्हापूर टूरिझम व कल्चरल फाउंडेशनमार्फत अध्यक्ष अमित चौकले यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना कोल्हापूर जिल्हा पर्यटन संवर्धन व विकासासंदर्भात सूचनांचे निवेदन दिले. फाउंडेशनमार्फत नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना उपलब्ध असलेल्या सोई आणि सुविधांसंदर्भात सर्वेक्षण अभियान राबविले. यामध्ये कोल्हापुरातील १५0 हून अधिक हॉटेल्स, लॉज आणि यात्री निवासामध्ये पर्यटकांसाठी असलेल्या सुविधांची माहिती जमा करण्यात आली.

या सर्वेक्षणादरम्यान ५000 हून अधिक पर्यटकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे, मोफत पार्किंग सुविधा, अल्पदरात निवास व्यवस्था, पर्यटक माहिती केंद्र, पर्यटकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आदींची सोय व्हावी, अशा अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केल्या आहेत. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या प्रश्नांवर शासन स्तरावर पाठपुरावा करून भविष्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती चौकले यांनी दिली.

या अभियानात शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्राध्यापक डी. एच. पवार, रोहित चौरे, फाउंडेशनचे उपाध्यक्ष रमेश पाटील, अमित गायकवाड, विशाल पवार यांनी सहभाग नोंदविला.


------------------------------------------
(संदीप आडनाईक)

 

Web Title: Tourism Week by Kolhapur Tourism Cultural Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.