शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

तोतापुरी, डाळिंबांची आवक वाढली, मेथी, कोथिंबिरीचा दर चढाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 11:38 IST

तोतापुरी आंबा व डाळिंबांची आवक वाढली आहे. कोल्हापुरात तोतापुरीची रोज १0 टन आवक होत असल्याने बाजारात सगळीकडे त्याची रेलचेल दिसते. मेथी, कोथिंबिरीचे दर मात्र चढेच राहिले असून, अजूनही कोथिंबीर ३० रुपये पेंढीच्या खाली येत नाही. कडधान्य बाजारात एकदम शांतता असून, शेंगदाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देतोतापुरी, डाळिंबांची आवक वाढलीमेथी, कोथिंबिरीचा दर चढाच : कडधान्य बाजार शांत

कोल्हापूर : तोतापुरी आंबा व डाळिंबांची आवक वाढली आहे. कोल्हापुरात तोतापुरीची रोज १0 टन आवक होत असल्याने बाजारात सगळीकडे त्याची रेलचेल दिसते. मेथी, कोथिंबिरीचे दर मात्र चढेच राहिले असून, अजूनही कोथिंबीर ३० रुपये पेंढीच्या खाली येत नाही. कडधान्य बाजारात एकदम शांतता असून, शेंगदाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.जून महिना संपत आल्याने मद्रास हापूस पायरीची आवक कमी झाली असून, आता ‘लालबाग’ व ‘नीलम’ आंबे बाजारात दिसू लागले आहेत. त्यांच्या जोडीला तोतापुरी आंब्यांची आवकही सुरू झाली असून, रोज १0 टन तोतापुरी बाजार समितीत येतो; त्यामुळेच फळबाजारासह शहरातील प्रमुख चौकांत तोतापुरीची रेलचेल दिसते.

डाळिंबांची आवक अद्याप कायम आहे. फणस, अननस, पपईची आवक मोठ्या प्रमाणात दिसते. आवक चांगली असल्याने दर मर्यादित राहिले आहेत. लिंबूची मागणी कमी झाल्याने किरकोळ बाजारात १0 रुपयांना पाच ते १0 लिंबू मिळत आहेत.भाजीपाला बाजारात स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर काहीसे तेजीत आहेत. भेंडी, दोडका ६० रुपये किलो, तर वांगी ४० पासून ६० रुपये किलोपर्यंत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बहुतांश भाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. वरण्याची आवक कमी असल्याने दर चढे राहिले आहेत.

घाऊक बाजारात ७५ रुपये किलो दर असून, गवारीच्या दरात काहीशी वाढ दिसते. कोथिंबिरीची आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. घाऊक बाजारात सरासरी २३ रुपये पेंढी असली, तरी किरकोळ बाजारात किमान ३० रुपये मोजावे लागत आहेत.

मक्का कणसाची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात सरासरी २५० रुपये शेकडा असले, तरी किरकोळमध्ये १0 रुपये कणसाचा दर आहे. पालेभाज्यांचे दर वाढले असून, मेथी २० रुपये, पोकळा १५ रुपये पेंढी आहे.पावसाने हुलकावणी दिल्याने कडधान्य बाजार काहीसा शांत दिसतो; त्यामुळे डाळींच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. तांदळाच्या दरात प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांची वाढ दिसते. शेंगांचे दर वाढल्याने शेंगदाणा व शेंगतेलाच्या दरातही वाढ होत आहे.

शेंगदाणा ८० रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. येत्या आठवड्याभरात शेंगतेलाचा दर १५0 रुपये ओलांडेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. साखरेचे दर स्थिर असून, घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३२०० रुपये दर असला तरी किरकोळ बाजारात तो ३६०० रुपये आहे.

कांदा-बटाटा स्थिर!कांदा-बटाट्याची आवक थोडी वाढली असून, बाजार समितीत रोज १२ हजार पिशव्यांची आवक होते. घाऊक बाजारात कांदा १३ रुपये, तर बटाटा १५ रुपये किलो आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत लसणाच्या दरात थोडी वाढ दिसते. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर