शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

टाटा, कोयनेच्या पाण्याचा अहवाल चुकीचा- कदम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 05:50 IST

टाटा व कोयना धरणातील पाणी टप्प्या-टप्प्याने पश्चिम महाराष्टÑ व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला वळविण्याबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने दिलेला अहवाल चुकीचा, तकलादू आणि एकांगी असून मूळ शासननिर्णयाशी विसंगत आहे.

कोल्हापूर  - टाटा व कोयना धरणातील पाणी टप्प्या-टप्प्याने पश्चिम महाराष्टÑ व मराठवाड्यातील दुष्काळी भागाला वळविण्याबाबत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने दिलेला अहवाल चुकीचा, तकलादू आणि एकांगी असून मूळ शासननिर्णयाशी विसंगत आहे. या शासन निर्णयासाठी वॉटर आर्मी शासनाला पर्यायी अभ्यास व कृतीगट तयार करणार असल्याची माहिती किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक व टाटा - कोयना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी सोमवारी दिली आहे.कदम म्हणाले, आपल्या सततच्या आंदोलनानंतर आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने दि.२ आॅगस्ट २०१८ रोजी कोयना जलविद्युत प्रकल्प व टाटा जलविद्युत प्रकल्प समूहातून वीजनिर्मितीसाठी कृष्णा खोऱ्यातून विपुलतेच्या खोºयात वळवण्यात येणारे पाणी टप्प्या-टप्प्याने कमी करण्याकरिता अभ्यास करण्यासाठी अभ्यास समिती नेमली होती. या समितीने मुदतीत एकही बैठक घेतली नव्हती. किसान आर्मी व वॉटर आर्मीच्या आंदोलनामुळे समितीने तीन महिन्यांचा कालावधी वाढवून अगदी घाईघाईने पश्चिमेकडचे पाणी पूर्वेकडे वळवू नये, असा अहवाल सादर केला.या अहवालाबाबत आपण तीव्र आक्षेप घेतला असून हा अहवाल महाराष्टÑासाठी नव्हे तर टाटा कंपनीसाठी तयार केला असून कोणताही व्यापक अभ्यास न करता प्रचलित चर्चेनुसार सादर केला आहे.समितीने शासननिर्णयामधील अनेक वाक्यांचा अर्थबोध लागत नाही, असे लिहिले आहे. अभ्यास समितीचा ढोंगीपणा असून शासननिर्णयातील सर्व वाक्ये अगदी साधी, सरळ आहेत. समितीसाठी एका भाषातज्ज्ञांची नेमणुकीची गरज होती का असा प्रश्न पडावा इतका चुकीचा अर्थ समितीने शासननिर्णयाचा जाणीवपूर्वक लावला आहे.समितीत जलसंपदातील नोकरशहांचा भरणाकदम म्हणाले, शासनाने नेमलेल्या समितीमध्ये राज्यघटना,पर्यावरण, ऊर्जा आदी विविध क्षेत्रांतील तज्ञ मंडळींचा समावेश असणे गरजेचे होते; परंतु केवळ जलसंपदा विभागातील नोकरशहांचा भरणा होता. या अहवालात लोकप्रतिनिधी सदस्यांची मतेही विचारात घेतलेली नाहीत. हे सर्व आश्चर्यकारक व हास्यास्पद आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरण