शिरोळ संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:35+5:302021-05-24T04:22:35+5:30

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी इचलकरंजी येथील चाणक्य अंत्यसंस्कार केंद्राला शेणी दानचा उपक्रम राबविला. स्वाभिमानी संघटनेचे ...

Top Brief News | शिरोळ संक्षिप्त बातम्या

शिरोळ संक्षिप्त बातम्या

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी इचलकरंजी येथील चाणक्य अंत्यसंस्कार केंद्राला शेणी दानचा उपक्रम राबविला. स्वाभिमानी संघटनेचे विश्वास बालिघाटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे दोन हजार शेणी दान करण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद कोरबू, बाबासाहेब हेरवाडे, अविनाश चौताळे, देवदत्त आंबेकर, संजय पाटील, आदी सहभागी झाले होते.

फोटो - २३०५२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थांनी इचलकरंजी अंत्यसंस्कार केंद्राला शेणी दान केल्या.

------

'मेस्टा'च्या जिल्हा सरचिटणीसपदी मोहन माने

शिरोळ : येथील रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रमुख प्रा. मोहन माने यांची राज्य पातळीवरील महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज (मेस्टा) च्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी पाठविले असल्याची माहिती माने यांनी दिली.

फोटो - २३०५२०२१-जेएवाय-०२-मोहन माने

-----

मातीचा ढीग हटवा

जयसिंगपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरातील अकराव्या गल्लीतील इंगळे दवाखान्याशेजारी मातीचा ढीग आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर साचत आहे. त्यामुळे हा मातीचा ढीग हलविण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

--

नियमांचे पालन करा

शिरोळ : शहरासह तालुक्यात आज, सोमवारपासून सकाळी सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. नियमांचे पालन न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गर्दी न करता नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

--

Web Title: Top Brief News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.