शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

कालचे जीवलग, आजचे प्रतिस्पर्धी

By admin | Updated: August 29, 2015 01:06 IST

तीन माजी नगरसेवक रिंगणात : मैत्रीपूर्ण वातावरणामुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था

तानाजी पोवार- कोल्हापू--‘राजकारणात कोण कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो,’ प्रभाग क्र. ४९ रंकाळा स्टँडमध्ये सध्या असेच चित्र आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत मित्र असणारे माजी नगरसेवक आता एकमेकांविरोधात निवडणुकीस उभे ठाकले आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढतीला विशेष महत्त्व आहे. गेल्या निवडणुकीतील तटाकडील तालीम आणि दुधाळी पॅव्हेलियन या दोन प्रभागांची फोड करून नव्याने रंकाळा स्टँड असा प्रभाग केला आहे. हा प्रभाग ‘सर्वसाधारण’साठी खुला झाल्याने अनेक इच्छुकांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. सुमारे ६४५६ मतदार असणाऱ्या या प्रभागात शिवसैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने येथून शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. रंकाळा वेश, गंगावेश, बाबूजमाल आणि धोत्री या तीन जुन्या तालीम संस्थांचा यात समावेश आहे; पण या तालीम संस्था स्थानिक राजकारणापासून नेहमीच अलिप्त राहतात. सद्य:स्थितीत या प्रभागातून माजी नगरसेवक संभाजी बसुगडे, माजी नगरसेवक सुजय पोतदार, माजी नगरसेवक धनाजी आमते, माजी नगरसेविका वनिता माने यांचे पती दिलीप जयसिंगराव माने यांच्यासह सचिन यशवंत बिरंजे, शेखर श्रीकांत कुसाळे, रणजित सर्जेराव आयरेकर, संदीप कसबेकर, दीपक जाधव, सनी सावंत, आदी निवडणूक रिंगणात येऊ पाहत आहेत. प्रत्येकाने घर ते घर असाच प्रचार सुरू केला आहे. प्रभागात जुने मित्र आता एकमेकांच्या विरोधात ठाकले असल्याने प्रचार मोहिमेत एकमेकांसमोर आल्यानंतर ते एकमेकांना शुभेच्छा देतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे असे चित्र पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचीही संभ्रमावस्था होत आहे. संभाजी बसुगडे हे १९७८ पासून महापालिकेवर तीन वेळा विजयी झाले, तर एकदा त्यांना ‘स्वीकृत नगरसेवक’पद मिळाले. १९९० मध्ये त्यांच्या पत्नी शोभा बसुगडे या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे ते सर्वांशी परिचितच आहेत. अनुभव आणि समाजकार्याच्या जोरावर ते पुन्हा या प्रभागातून निवडणुकीसाठी उतरत आहेत. ते महाडिक समर्थक असल्याने त्यांनी ताराराणी आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. धनाजी आमते यांनीही १९९५ मध्ये शुक्रवार गेट या प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. शुक्रवार गेट, ऋणमुक्तेश्वर परिसर या भागावर आमते यांच्यासह बसुगडे यांचे वर्चस्व आहे. येथील कुंभार समाजाच्या ६०० मतांवर अनेकांचा डोळा आहे.याशिवाय सुजय पोतदार यांनी २००० मध्ये दुधाळी पॅव्हेलियन प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे, तर २०१० च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी प्राजक्ता पोतदार यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यांचा जुना हक्काचा दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातील विकास हायस्कूल, पेठे-पाटील क्लास, सुवर्णा कॅफे, रेगे तिकटी, शाहू उद्यान, दत्त महाराज मंदिर ते रंकाळा स्टँड असा सुमारे दोन हजार मतांचा गठ्ठा नव्या रंकाळा स्टँड प्रभागात समाविष्ट होत असल्याने ते त्या जोरावर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरत आहेत. पोतदार यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. १९९५ मध्ये तटाकडील प्रभागाचे प्रतिनिधित्व केलेल्या वनिता माने यांचे पती दिलीप माने हेही पुन्हा रिंगणात उतरत आहेत. २००५ मध्ये विजयाच्या जवळपास पोहोचले होते; पण अवघ्या ९० मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. ते शिवसेनेच्या उमेदवारीवर लढण्यास इच्छुक आहेत. पाडळकर मार्केट परिसरातील झोपडपट्टीचा घरफाळा, वीज त्यांनी अधिकृत करून दिले. त्याशिवाय वनिता मानेंच्या कारकिर्दीतील विकासकामांचा सपाटा त्यांनी मतदारांसमोर ठेवला आहे.गंगावेश डी वॉर्ड शिवसेनेचे विभागप्रमुख सचिन बिरंजे हेही निवडणूक रिंगणात उतरत आहेत. काका धनाजी बिरंजे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत त्यांनी आपली तयारी केली आहे. धनाजी बिरंजे यांनी शिवसेनेचे सुमारे १३ वर्षे शहराध्यक्षपद भूषविले आहे, तर २००० च्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यांच्या तसेच स्वत:च्या समाजकार्यावर सचिन हे निवडणुकीत उतरत आहेत.व्यवसायाने कारखानदार असणारे शेखर श्रीकांत कुसाळे हेही प्रभागातून नशीब अजमावत आहेत. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची प्रतिमा आहे. परिसरातील तालीम संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्ये केली आहेत. शिवसेनेतर्फे सक्रिय असलेले रणजित सर्जेराव आयरेकर हे युवा सेना, कोल्हापूर जिल्हा समन्वय असून कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेते असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. टोल, सर्किट बेंच, एलबीटी आंदोलनात तसेच शिवसेनेच्या सर्व कार्यांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांनीही शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे.प्रभाग असा...केदारलिंग बेकरी, चिंतामणी हॉस्पिटल, गोल सर्कल, धोत्री गल्ली, शाहू उद्यान बाग, निशिकांत ट्रेडर्स, काजवे बिल्डिंग ते श्रीकृष्ण मंदिर, गंगावेश तालीम, पाडळकर मार्केट, सुवर्ण कॅफे, विकास विद्यामंदिर, माने हॉल, उत्तरेश्वर मित्रमंडळ, शिव वाचनालय, लाड बोळ, शिंदे गल्ली, रेवणकर आॅटोमोबाईल, गंगा हॉस्पिटल, दत्तमंदिर, आयरेकर गल्ली, केएमसी कॉलेज, खर्डेकर विद्यालय, रमाबाई विद्यालय, सावंतवाडा, लीला हॉस्पिटल, गंजी गल्ली, विश्वास अपार्टमेंट, बाबूजमाल, रंकाळा स्टँड, ताराबाई रोड, नागराज मंदिर, कद्रे गल्ली दक्षिणेकडील भाग, वाचाली बेकरी.शिवसेनेच्या उमेदवारीला मागणी जास्तया प्रभागावर शिवसेनेचा बऱ्यापैकी पगडा असल्याने दिलीप माने, सचिन बिरंजे, रणजित आयरेकर, शेखर कुसाळे यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे. सारेच शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याने प्रत्येकाने स्वत:ला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यांपैकी काहींनी उमेदवारी न मिळाल्यास बंडाचाही झेंडा उचलणार असल्याचे सांगितले.