शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

‘लोकमत’चा उद्या वर्धापनदिन सोहळा

By admin | Updated: August 19, 2015 01:08 IST

मान्यवरांची उपस्थिती : धैर्यप्रसाद हॉलमध्ये होणार स्नेहमेळावा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या समाजजीवनाचे महत्त्वाचे अंग बनलेल्या आणि ‘पत्रकारिता परमो धर्म’चे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’चा उद्या, गुरुवारी अकरावा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त येथील ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होणार आहे.या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन महापौर वैशाली डकरे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित असणार आहेत. वर्धापनदिनानिमित्त ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ हा विशेषांक प्रसिद्ध होईल. वाचकांच्या भेटीला हा विशेषांक आज, बुधवारपासून येणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. थेट पाईपलाईन, हद्दवाढ, उद्योग-व्यापार, अंबाबाई मंदिर, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या, आदी प्रश्नांवर ‘आता बस्स्’च्या माध्यमातून त्याने लोकप्रतिनिधी व शासनाला हादरवून सोडले. त्यामुळे वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. यातील बहुतांश प्रश्नांवर कार्यवाही सुरू झाली. काहींची सोडवणूक झाली. बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’ आणि ‘बाल मंच’च्या माध्यमातून ‘लोकमत’ सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदेखील राबविते. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चा रोजचा अंक व विविध पुरवण्यांमधून वाचकांना सकस, उत्तम ज्ञान आणि माहिती देण्याचा प्रयत्न राहिला आहे. जे चुकीचे आहे त्यावर प्रहार करतानाच जे चांगले आहे त्याला आवर्जून बळ देण्याची भूमिकाही ‘लोकमत’ने सक्षमपणे बजावली आहे. पत्रकारितेची मूल्ये जपतानाच समाजातील बंधुभाव वाढीस लागावा, असा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे वाचकांकडून ‘लोकमत’ला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याची शिदोरी घेऊनच ‘लोकमत’ हा वर्धापनदिन सोहळा साजरा करीत आहे. (प्रतिनिधी) छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मानकोल्हापूर : ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा ११ वा वर्धापनदिन व जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज, बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शाहू स्मारक भवनच्या कला दालनात सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या उद्घाटन समारंभास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर, शेखर वाली व बापू मकानदार यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्य प्रायोजक म्हणून आर. एल. ज्वेलर्स, सहप्रायोजक म्हणून सुभाष फोटो स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले आहे. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेत ‘ग्लोबल-लोकल टुरिझम’ आणि ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ असे दोन विषय दिले होते. निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. या छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम चेतना अपंगमती विकास संस्थेला देण्यात येणार आहे; तरी अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेत सामाजिक कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ भेटीलायावर्षीच्या वर्धापनदिनानिमित्त ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. कोल्हापूरकरांनी जगाच्या कानाकोपऱ्यांत आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रांत त्यांनी तेथे आपले पाय घट्ट रोवले आहेत. कोल्हापूरची माणसे जगभरात आहेत. त्यांची या विशेषांकाच्या माध्यमातून ओळख करून देण्यासह भेट घडवून देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे.स्नेहमेळावा वेळ : गुरुवारी,सायंकाळी पाच ते रात्री नऊ स्थळ : धैर्यप्रसाद हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर