शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

बंदोबस्त मिळाला की टोल कधीही सुरु

By admin | Updated: June 8, 2014 01:12 IST

‘आयआरबी’ची तयारी : प्रशासन सहकार्य करत नसल्याची तक्रार

कोल्हापूर : कोल्हापूरातील वादग्रस्त रस्ते प्रकल्पातून टोल वसूली करण्यास पोलिस बंदोबस्त मिळाला की कोणत्याही क्षणी टोलवसूली सुरु करण्याची तयारी आयआरबी कंपनीने केली आहे. त्यासाठीची आवश्यक यंत्रणा कंपनीने सज्ज ठेवली आहे. दरम्यान कंपनीने स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन, पोलीस खाते आणि महापालिका प्रशासन योग्य ते सहकार्य करत नसल्याचा कांगावा करीत राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या प्रती कंपनीने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पाठविल्या आहेत.टोलविरोधात सोमवारी सर्वपक्षीयांच्यावतीने विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे हा मोर्चा निघाल्यावर पोलिसांनी तातडीने बंदोबस्त द्यावा अशी कंपनीची मागणी आहे. त्यामुळे बंदोबस्त मिळाल्यास बहुधा बुधवारपासून (दि.११) टोलवसूली सुरु करण्याची कंपनीची तयारी आहे. त्यासाठी सुरुवातीला कांही दिवस संगणक न बसविता पावत्या फाडल्या जाणार आहेत. नऊपैकी पाच नाक्यांवरील सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज आहे. कर्मचाऱ्यांना शेजारच्या गावांमध्ये आणून ठेवण्यातआलेआहे. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर शहरातील टोलसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेवरील अंतिम सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंत आयआरबी कंपनीने अपूर्ण रस्ते तातडीने पूर्ण करावेत, निकृष्ट कामाचा दर्जा सुधारावा, त्याचबरोबर पोलिसांनी टोलवसुलीला पुरेसे पोलीस संरक्षण द्यावे, असा अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार आयआरबी कंपनीने टोलवसुलीकरिता पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. त्या दृष्टीने टोलनाके सज्ज ठेवले आहेत.तथापि, कोल्हापुरातील सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने टोलविरोधी महामोर्चा आयोजित केला आहे. त्यामुळे शहरातील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण बनण्याची शक्यता आहे.