शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

‘टोलमुक्त कोल्हापूर’ हीच श्रद्धांजली

By admin | Updated: February 27, 2015 00:19 IST

पानसरे शोकसभेत मान्यवरांचे मनोगत : निर्णायक टप्प्यावर असताना आंदोलनातील सेनापती गेला

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी पक्षीय चौकटीपेक्षा बहुजनांच्या, कष्टकऱ्यांच्या हिताची काळजी केली. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले टोलविरोधी आंदोलन निर्णायक टप्प्यावर असताना त्यातील महत्त्वाचा सेनापती आपल्यातून निघून गेला आहे; पण कोल्हापूर टोलमुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आणि हीच पानसरेंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केले. कोल्हापुरातील विठ्ठल मंदिरात टोलविरोधी कृती समितीच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. विवेक घाडगे होते. यावेळी समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे म्हणाले, या आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा अण्णांनी आपण दगडावर डोकं आपटतोय, ती तयारी ठेवून लढा आणि ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने आंदोलन पुढे न्यायचे असा कानमंत्र दिला. त्यानुसार यापुढेही आंदोलन सुरू राहील. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, शाहू जन्मस्थळाचा प्रश्न पानसरे अण्णांमुळे मार्गी लागला. राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामित्व ते आपल्या भाषणातून मांडत होते. त्यांच्यावरचा हल्ला म्हणजे व्यक्तीवरचा नाही, तर कार्यकर्त्यांवरचा हल्ला आहे. गणी आजरेकर यांनी ‘पानसरे, हम शरमिंदा है कि तेरे कातील अभी जिंदा है, पानसरे यांनी जातधर्म न पाहता सगळ्यांवर नि:स्सीम प्रेम केले, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी अण्णांचे विचार जोपासणे हीच त्यांना श्रद्धांजली असेल, असे मत व्यक्त केले. पद्माकर कापसे यांनी अण्णांचा स्मृतिग्रंथ काढण्यात यावा, अशी सूचना केली. अध्यक्ष विवेक घाडगे म्हणाले, गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झालेला दिवस आणि त्यांच्या निधनानंतरचे दोन दिवस कोणीही ‘बंद’ची हाक न देता कोल्हापूरकरांनी बंद पाळून ‘विचार मारले जात नाहीत’ असे हल्लेखोरांना खणखणीत उत्तर दिले आहे. एवढी मोठी हानी होऊनही दगड उचलला गेला नाही, काडी पेटवली गेली नाही, ही अण्णांच्या विचारांची ताकद आहे. टोलमुक्ती झाल्यानंतर या आंदोलनाचे समर्पण पानसरेंना केले जाईल.यावेळी वैशाली महाडिक, ‘शेकाप’चे भारत पाटील, उदय लाड, अशोक पोवार, ‘मनसे’चे प्रसाद पाटील, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, भगवान काटे, प्रसाद जाधव, समीर नदाफ, आर्किटेक्ट राजू सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, सुरेंद्र पन्हाळकर, संभाजी जगदाळे, जहिदा मुजावर, सुमन वाडेकर, मीरा मोरे, नीता राऊत शीतल तिवडे, सुनीता राऊत, अनिल सासने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘यांची’ चौकशी का नाही? प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई म्हणाले, पानसरेंवरील हल्ल्याला ११ दिवस झाले तरी पोलिसांना त्यांचे मारेकरी शोधण्यात यश आलेले नाही. पुरोगामी नेत्यांची चौकशी करताना पोलिसांनी ‘आयआरबी’च्या मालकाची चौकशी का केली नाही? टोलनाक्यावर बसलेल्या गुंडांची चौकशी का केली नाही? चळवळी करणाऱ्यांचे खून होत राहतील आणि आपण फक्त श्रद्धांजली वाहणार का? असा प्रश्न उपस्थित केला. सभेतील ठराव गोविंद पानसरे यांना विचारांना जिवंत ठेवत व्याख्यानांचे आयोजनस्मृतिग्रंथाचे प्रकाशन पानसरे यांच्या व्याख्यानांची पुस्तके, सीडींचे प्रकाशन अण्णांचे निधन झाले तो दिवस ‘शहीद दिन’ म्हणून साजरा करणार.