शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

'जिल्हा बार'साठी आज मतदान

By admin | Updated: April 30, 2016 00:45 IST

४२ जण रिंगणात : खंडपीठ, न्याय संकुलातील सुविधांच्या मुद्द्यावर प्रचार रंगला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसाठी आज, शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे. मतदानासाठी १८९२ सभासद पात्र आहेत. खंडपीठ, न्यायसंकुलातील आवश्यक सुविधा, सभासद हित आदी मुद्द्यांवर शुक्रवारी दिवसभर पॅनेलप्रमुख, उमेदवारांचा प्रचार रंगला.बार असोसिएशनची २०१६-१७ या वर्षासाठीची निवडणूक १५ जागांसाठी होत आहे. त्यातील अध्यक्षपदाच्या गटात अ‍ॅड. प्रकाश मोरे, मनोहर बडदरे आणि शिवराम जोशी यांच्यात लढत होत आहे. अध्यक्षपदाच्या संबंधित उमेदवारांनी स्वतंत्रपणे पॅनेलची उभारणी केली आहे. त्याद्वारे त्यांनी अन्य नऊ संचालक पदासाठी २४ जण रिंगणात उतरविले आहेत. पॅनेलप्रमुख आणि उमेदवारांनी गुरुवारपासून प्रचाराला सुरुवात केली. शुक्रवारी सकाळपासून त्यांनी प्रचाराचा वेग वाढविला. मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर त्यांनी भर दिला. प्रचारात खंडपीठाची मंजुरी, महसूल न्यायाधीकरण, सहकार न्यायालयाची कोल्हापुरात २२ निर्मिती, न्यायसंकुलातील आवश्यक सुविधा आणि सभासद हित आदी मुद्द्यांवर पॅनेलप्रमुख, उमेदवारांकडून आश्वासने देण्यात आली. निवडणूक लढविणाऱ्या तिन्ही पॅनेलप्रमुखांनी आपली भूमिका जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारनंतर सभासदांसमोर मांडली. दरम्यान, निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत असोसिएशनमध्ये मतदान होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. सुभाष पिसाळ यांनी दिली. ते म्हणाले, मतदानासाठी १८९२ सभासद पात्र आहेत. एकावेळी १५ जणांना मतदान करता येईल यादृष्टीने नियोजन व तयारी केली आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)पॅनेलप्रमुखांची भूमिका...खंडपीठासाठी रस्त्यावरील लढाई कायम राहीलखंडपीठासाठीचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. खंडपीठासाठी चर्चेची तयारी असून रस्त्यावरची लढाई आम्ही कायम ठेवणार असल्याचे अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, न्यायसंकुलाच्या नव्या इमारतीमध्ये वकील, पक्षकारांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. या सुविधांसाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे. न्यायसंकुल परिसरात दोन हजार झाडे मे महिन्याच्या अखेरपर्यंत आम्ही लावणार आहोत.सनदशीर मार्गाने प्रश्न सोडविणारखंडपीठासह विविध मागण्या, प्रश्न सनदशीर मार्गाने सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याबाबतचा लढा प्रभावीपणे आणि लोकांपर्यंत पोहोचविण्यात येईल, अ‍ॅड. मनोहर बडदरे यांनी सांगितले. ते म्हणाले, वकिलांसाठी पेन्शन स्कीम, मेडिक्लेम पॉलिसी आदी योजना असोसिएशनमार्फत राबविल्या जातील. त्यासह ई-लायब्ररी, विविध विषयांवरील मार्गदर्शन शिबिरे आदी उपक्रम राबविण्याचा विचार आहे. तालुका आणि जिल्हा बार असोसिएशनमध्ये समन्वय साधण्याची भूमिका आहे. न्यायसंकुलात आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत पाठपुरावा केला जाईल.आंदोलनाला गती देणारकाही चुकीच्या घटनांमुळे खंडपीठाबाबतच्या आंदोलनात आपण पाच वर्षांनी मागे आलो आहोत. या आंदोलनाला योग्य गती देण्याचे काम आम्ही करणार आहोत. खंडपीठाची मागणी सत्यात उतरविण्याचे काम आम्ही करू, असे अ‍ॅड. शिवराम जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, न्याय संकुलाच्या नव्या इमारतीत वकील, पक्षकारांसाठीच्या अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यात वाहनांसाठी कव्हर्ड पार्किंग, प्रसाधनगृह, भोजन करण्यासाठीची सुविधा आदींचा समावेश आहे. त्यांची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न राहील. खंडपीठासाठी आवश्यक असणारे महसूल न्यायाधीकरण, सहकार न्यायालय कोल्हापुरात साकारण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत.