आज ८ केंद्रांवर १८ ते ४४ मधील नागरिकांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:25 AM2021-05-09T04:25:46+5:302021-05-09T04:25:46+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील आठ केंद्रांवर आज, रविवारी १८ ते ४४ वयोगटातील ज्यांनी नोंदणी ...

Today, vaccinations are being given to 18 to 44 citizens at 8 centers | आज ८ केंद्रांवर १८ ते ४४ मधील नागरिकांना लस

आज ८ केंद्रांवर १८ ते ४४ मधील नागरिकांना लस

Next

कोल्हापूर जिल्ह्यातील आठ केंद्रांवर आज, रविवारी १८ ते ४४ वयोगटातील ज्यांनी नोंदणी केली आहे, अशा नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. शनिवारी दिवसभरामध्ये जिल्ह्यात दोन्ही डोसचे १४ हजार १३६ लसीकरण करण्यात आले आहे.

सुरुवातीला ग्रामीण रुग्णालय शिरोळ, उपजिल्हा रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय कागल, प्राथमिक आरोग्य केंद्र, भेडसगाव आणि कोल्हापूर महापालिकेचा भगवान महावीर दवाखाना, विक्रमनगर येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत होती. मात्र आता त्यात आणखी तीन केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज; ग्रामीण रुग्णालय गारगोटी, हातकणंगले याही ठिकाणी रविवारी वरील वयोगटांतील ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना त्यांच्या वेळेला लस मिळणार आहे.

शनिवारी दिवसभरामध्ये ३ हजार ५८३ जणांना पहिला, तर १० हजार ५५३ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मात्र रविवारी नेमकी लस कधी उपलब्ध होणार याची माहिती शनिवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नव्हती.

Web Title: Today, vaccinations are being given to 18 to 44 citizens at 8 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.