शिकारपूर यांचे आज व्याख्यानआयटीमधील करिअर संधी : भारती विद्यापीठ व ‘लोकमत युवा नेक्स्ट’चा उपक्रमकोल्हापूर : येथील कदमवाडीतील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटमध्ये संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचे ‘आयटी इंडस्ट्रीजमधील करिअर संधी’ या विषयावर उद्या, शनिवारी सायंकाळी पाच वाजता व्याख्यान होणार आहे.लोकमत युवा नेक्स्ट, भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट आणि रोटरी क्लब आॅफ हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान आयोजित केले आहे. डॉ. शिकारपूर हे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सदस्य आहेत. आॅटोलाईन डिझायनिंग सॉफ्टवेअर लिमिटेड आणि सीड इन्फोटेकचे संचालक आहेत. आयटी तंत्रज्ञानाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे, तरी त्यांचे ‘आयटी इंडस्ट्रीजमधील करिअर संधी’ या विषयावरील मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्याख्यानास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
शिकारपूर यांचे आज व्याख्यान, आयटीमधील करिअर संधी
By admin | Updated: July 12, 2014 00:41 IST