शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

आज अखेरच्या दिवशी उडणार झुंबड

By admin | Updated: February 6, 2017 01:10 IST

‘ए बी’ फॉर्म भरणे आवश्यक

 कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज भरण्याचा आज, सोमवार शेवटचा दिवस असून, दुपारी तीनपर्यंत जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अक्षरश: झुंबड उडणार आहे, तसेच पक्षाच्या उमेदवारांना ‘ए बी’ फॉर्म भरण्यासाठीची मुदत आजच संपत आहे. दरम्यान, रविवारी कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण ४३७ उमेदवारांनी ५२१ अर्ज दाखल केले. जिल्हा परिषदेच्या ६७ आणि पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी दि. २१ फेबु्रवारीला मतदान होत आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आज, सोमवारी संपते. रविवारी जिल्हाभर अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती. सोमवारी शेवटच्या दिवशी गडबड नको म्हणून अनेकांनी रविवारी अर्ज दाखल केले आहेत. रविवारअखेर जिल्हा परिषदेसाठी ३९१ तर पंचायत समितीसाठी ५५८ अर्ज दाखल झाले आहेत. आज, सोमवारी दुपारी ३ पर्यंत मुदत असल्याने सकाळी १० पासूनच अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते तालुक्याच्या ठिकाणी दाखल होणार आहेत. ए बी फॉर्मसाठीही शेवटची मुदत पक्षाच्या उमेदवारांनी ए बी फॉर्म दाखल करण्याची आजची शेवटची मुदत आहे. १ फेब्रुवारीपासून अनेकांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, पक्षाने ए बी फॉर्म दिलेले नाहीत अशांची संख्या मोठी आहे. अशांना आज दुपारी तीन वाजेपर्यंत ए बी फॉर्म भरणे बंधनकारक आहे तसा फॉर्म न भरल्यास संबंधित उमेदवार त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरू शकणार नाही. आवारात असतील त्यांचे अर्ज घेतले जाणार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज, सोमवारी शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी होणार असल्याने प्रशासनावरही ताण येणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. रविवारीच अनेक ठिकाणी तीन वाजून गेले तरी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. बहुतांशी पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असल्याने आज, सोमवारी सर्वजण अर्ज भरण्यासाठी गर्दी करणार आहेत. दुपारी तीननंतरही ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. मात्र, दुपारी तीनच्या आधी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत आवारात असणाऱ्या इच्छुकांना आवाहन करण्यात येणार आहे. त्यानंतर जे अर्ज भरून घेण्याच्या कार्यालयाच्या आवारात असतील अशांचेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. गर्दी आहे म्हणून संध्याकाळी पाच वाजता कोणी अर्ज दाखल करायला आला तर अर्ज घेतले जाणार नाहीत. जाहीर सूचना दिल्यानंतर जे आवारात असतील त्याच इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेण्यात येणार आहेत. एकमेकांच्या यादींवर लक्ष कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला विरोधकांच्या उमेदवारांची माहिती घेण्यातच अनेक नेत्यांचा वेळ गेला. एकमेकांची नावे कळू नयेत यासाठी अनेकांनी उर्वरित उमेदवारांच्या नावांच्या याद्याही रविवारी जाहीर केल्या नाहीत. सर्वांत प्रथम ‘भाजता’ने आपली यादी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीनेही दोन याद्या जाहीर केल्या होत्या. यानंतर तिसरी २० उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात येणार होती. मात्र तीही आता आज, सोमवारी सकाळी ११ वाजता जाहीर (पान १० वर)