शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आजपासून कायदा साक्षरता अभियान

By admin | Updated: March 13, 2015 23:54 IST

अनोखा उपक्रम : गोविंदराव पानसरे यांना वकिलांची कृतिशील आदरांजली

सांगली : पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांनी समाजजागृतीसह नागरिक कायद्याचे साक्षर व्हावेत यासाठी परिश्रम घेतले. पानसरे यांना कृतिशील आदरांजली वाहण्यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीने येत्या शनिवारपासून वर्षभराकरिता ‘कॉ. गोविंद पानसरे कायदे साक्षरता अभियान’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत शहरातील सहा वकिलांची टीम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी गावा-गावात जाऊन तेथील ग्रामस्थांना भेडसावत असलेल्या कायद्याच्या समस्या सोडविण्यासाठी मोफत सल्ला व साहाय्य करणार आहे.लोकशाहीप्रधान देशात कायद्याचे राज्य असले तरीही बहुतेकांना कायद्याची फारशी माहिती नसते. परिणामी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. हे थांबविण्यासाठी नागरिक ‘कायदा साक्षर’ होणे महत्त्वाचे आहे. गोविंद पानसरे यांनी आयुष्यभर सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलनाची हाक दिली व त्यांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबरीने त्यांना कायद्याबाबतही जागृत केले. दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या कायद्याची माहिती सामान्यांना व्हावी, या उद्देशाने सांगली जिल्हा सुधार समितीने वर्षभर कायदा साक्षरतेचा जागर करण्याचे कार्य हाती घेतले आहे. या अभियानाचा कोठेही गाजावाजा करण्यात येणार नसून, प्रत्यक्ष कृतिशील कार्य करण्यावर वकिलांचा भर राहणार आहे. यानिमित्त आयोजित बैठकीमध्ये ग्रामस्थांना कायद्याची सोप्या भाषेत माहिती देण्यात येणार आहे. दिवाणी, फौजदारी, कामगार कायदे, ग्राहक संरक्षण कायदा, सामाजिक व महिलाविषयक कायदे याबाबत प्रामुख्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठीही संबंधितांना मोफत सल्ला व साहाय्य करण्यात येणार आहे. नुकताच भूसंपादनविषयी कायदा लोकसभेत मंजूर झाला असला तरी ज्या शेतकऱ्यांना या कायद्याला सामोरे जावे लागणार आहे, त्यांना या कायद्याची माहितीच नाही. कायद्याच्या त्रुटी सोप्या भाषेत शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहेत. शनिवार, दि. १४ रोजी मिरज तालुक्यातील बिसूर येथून अभियानास प्रारंभ होत आहे. प्रत्येक शनिवारी गावा-गावात जाऊन ग्रामस्थांची सोयीची वेळ पाहून कायदा जागर करण्यात येणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या अभियानात अ‍ॅड. राहुल पाटील, अमित शिंदे, वैभव कदम, प्रियांका कस्तुरे, दीपक हेगडे, राहुल कांबळे हे युवा वकील सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे भविष्यकाळात विविध क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील कायदेशीर तज्ज्ञदेखील अभियानात सहभागी होण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. (प्रतिनिधी)गोविंद पानसरे यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविणारसांगली जिल्हा सुधार समितीचा उपक्रमबिसूर येथे आजपासून उपक्रमास प्रारंभशहरातील सहा वकिलांची टीम कार्यरतप्रत्येक शनिवारी गावा-गावात मार्गदर्शनग्रामस्थांना कायद्याच्या समस्या सोडविण्यासाठी मोफत सल्ला नागरिकांना ‘कायदा साक्षर’ बनविण्यासाठी प्रयत्न शेतकऱ्यासमोर भूसंपादन कायद्याच्या त्रुटीं मांडणारइतर कायद्यांबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारजनजागृती अभियान वर्षभर राबविणारमार्गदर्शक पुस्तिका..सर्वसामान्य नागरिकांना कायद्याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे सामान्यांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या ५० कायदेशीर तरतुदींची मार्गदर्शक पुस्तिका समितीतर्फे प्रकाशित करण्यात येणार आहे. सामान्य माणूस कायदा साक्षर होणे अत्यावश्यक होते. परंतु स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही तशी परिस्थिती नाही. यासाठीच काही युवा वकिलांनी कायदा साक्षरतेचे अभियान हाती घेतले आहे. वास्तविक ही एक चळवळच आहे. - अ‍ॅड. राहुल पाटील, सांगली.