शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

Kolhapur Politics: अडीचशे किलोमीटर क्षेत्रात प्रचार करताना उमेदवारांची दमछाक

By राजाराम लोंढे | Updated: April 8, 2024 11:56 IST

‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’मध्ये २३०० गावांचा समावेश : वाढत्या पाऱ्याने उमेदवारांसह प्रचारक घामाघूम

राजाराम लोंढे कोल्हापूर : चंदगडपासून गगनबावड्यापर्यंत आणि शियेपासून भुदरगडपर्यंत पसरलेला ‘कोल्हापूर’लोकसभा मतदारसंघ आणि चांदोलीपासून वाळव्याच्या जुनेखेड तर, खिद्रापूरपासून शाहूवाडीच्या उदगिरीपर्यंत व्यापलेल्या ‘हातकणंगले’मतदारसंघातील गावापर्यंत प्रचारासाठी जाताना उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची दमछाक उडत आहे. प्रत्येक मतदारसंघात सुमारे २५० किलो मीटरच्या अंतरात १२०० गावांत पाेहचणे तेही कडक उन्हाळ्यात कठीण होणार आहे.

चंदगडच्या ‘कोलिक’ पासून गगनबावडा, करवीरमधील शिये ते राधानगरीतील ओलवणपर्यंत आणि भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडीपर्यंत ‘कोल्हापूर’ लोकसभा मतदारसंघ विखुरला आहे. शिराेळमधील खिद्रापूर ते शाहूवाडीतील उदगिरी, शिराळ्यातील चांदोली ते वाळवा तालुक्यातील जुनेखेडपर्यंत पसरलेला ‘हातकणंगले’ मतदारसंघ हा सुमारे २५० किलो मीटर आहे. या क्षेत्रात प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. येथील मतदान ७ मे रोजी आहे, तोपर्यंत उन्हाचा तडाका वाढणार आहे. अशा वातावरणात बाराशे गावांपर्यंत पोहचण्यासाठी कसरतच करावी लागणार आहे.‘कोल्हापूर’ मतदारसंघात जवळपास ४ लाख ६४ हजार हे कोल्हापूर शहरातील तर ‘हातकणंगले’ मतदारसंघात ३ लाख ५० हजार हे ‘इचलकरंजी’ व ‘इस्लामपूर’ शहरातील मतदार आहेत. उर्वरित १४ ते १५ लाख मतदार हे ग्रामीण भागात असल्याने उमेदवार पुरते घामाघूम होणार आहेत.

सूर्य आग ओकताना प्रचार करायचा कसा?मतदानासाठी अजून एक महिना आहे, आताच जिल्ह्याचा पारा ४० डिग्रीपर्यंत पोहचला आहे. आगामी काळात तर सूर्य आग ओकणार असल्याने प्रचारासाठी घराबाहेर पडणे मुश्कील होणार आहे. तरुणांची घालमेल होते मग, वयाेवृद्ध उमेदवार व त्यांच्या प्रचारक मतदारांपर्यंत पोहचणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अपक्षांचा मतदारांना दुरूनच नमस्कारपक्षाच्या उमेदवारांची जेवढी यंत्रणा असते, तेवढी अपक्ष किंवा लहान पक्षांच्या उमेदवारांची नसते. त्यामुळे या उमेदवारांना छोट्या छोट्या गावात, वाड्यावस्त्यांवर पोहचता येत नसल्याने त्यांना मतदारांना दुरूनच नमस्कार करावा लागणार आहे.

असे पसरले मतदारसंघ :कोल्हापूर : चंदगडचे कोलिक, तिलारी ते गगनबावडा. करवीरमधील शिये ते राधानगरीचे शेवटचे टोक ओलवण. अंबोलीच्या शेजारील किटवडे ते पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव. गडहिंग्लजमधील काटवी कट्टी, तेरणी ते भुदरगड तालुक्यातील तांब्याची वाडी.

हातकणंगले : शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर ते शाहूवाडीतील उदगिरी. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ ते शिराळा तालुक्यातील चांदोली. वाळवा तालुक्यातील जुनेखेड ते हातकणंगले तालुक्यातील अंबप-मनपाडळे.दृष्टिक्षेपात मतदान केंद्रे व मतदान-

मतदारसंघ - केंद्रे  - मतदानकोल्हापूर - २१५६ - १९ लाख २१ हजार ९३१हातकणंगले - १८६० - १८ लाख १ हजार २०३

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा